नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३१ डिसेंबर

घटना :-

२००४ - त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.

१९९९ - बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१९९९ - पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.

१९४४ - दुसरे महायुद्ध - हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१८७९ - थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

१८०२ - इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.

१६०० - ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

जन्म :-

१९४८ - डोना समर अमेरिकन गायिका

१९३७ - अँथनी हॉपकिन्स वेल्श अभिनेता

१९१० - पं. मल्लिकार्जुन मन्सूर हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक

१८७१ - गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक

मृत्यू :-

१९९७ - स्वरराजछोटा गंधर्व

१९८६ - राजनारायण केंद्रीय आरोग्य मंत्री

१९७१ - डॉ. विक्रम साराभाई भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
१९२६ - वि. का. राजवाडे इतिहासाचार्य

३० डिसेंबर

घटना :-

१९४३ - सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला

१९२४ - एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

१९०६ - ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

जन्म :-

१९०२ - डॉ. रघू वीरा भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार

१८७९ - वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी भारतीय तत्त्ववेत्ते

१८८७ - डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक

१८६५ - रुडयार्ड किपलिंग नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक

मृत्यू :-

२००६ - सद्दाम हुसेन - इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष

१९८७ - दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता’ – संगीतकार 

१९८२ - दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक

१९७४ - आचार्य शंकरराव देव गांधीवादी कार्यकर्ते 

१९७१ - डॉ. विक्रम साराभाई भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१९४४ - रोमें रोलाँ फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक
१६९१ - रॉबर्ट बॉईल आयरिश रसायनशास्त्रज्ञ

२९ डिसेंबर

घटना :-

१९५९ - नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

१९५९ - पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

जन्म :-

१९४२ - राजेश खन्ना चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य

१९१७ - रामानंद सागर हिन्दी चित्रपट निर्माते

१९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी

१९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते

१८०८ - अँड्र्यू जॉन्सन अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष

१८०० - चार्ल्स गुडईयर अमेरिकन संशोधक

मृत्यू :-

२०१२ - टोनी ग्रेग इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक

१९८६ - हॅरॉल्ड मॅकमिलन इंग्लंडचे पंतप्रधान
१९६७ - पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक

२८ डिसेंबर

घटना :-

१८९५ - ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.   

१८८५ - मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना

१८४६ - आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.

१८३६ - स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१६१२ - गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.

जन्म :-

१९५२ - अरुण जेटली केंद्रीय मंत्री व वकील

१९४५ - वीरेंद्र नेपाळचे राजे

१९४० - ए. के. अँटनी भारताचे परराष्ट्रमंत्री

१९३७ - रतन टाटा उद्योगपती

१९३२ - धीरुभाई अंबानी उद्योगपती

१९२६ - हुतात्मा शिरीषकुमार

१८९९ - गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार

१८५६ - वूड्रो विल्सन अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते

मृत्यू :-

२००६ - प्रभाकर पंडित संगीतकार व व्हायोलिनवादक

२००० - मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे तत्त्वचिंतक

१९७७ - सुमित्रानंदन पंत छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी

१९३१ - आबालाल रहमान चित्रकार
१६६३ - फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

२७ डिसेंबर

घटना :-

१९७५ - बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.

१९४९ - इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९४५ - २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.

१९११ - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मनहे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी१९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

जन्म :-

१९४४ - विजय अरोरा हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता

१८९८ - डॉ. पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री

१८२२ - लुई पाश्चर फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

१७९७ - मिर्झा गालिब उर्दू शायर

१६५४ - जेकब बर्नोली स्विस गणितज्ञ

१५७१ - योहान केपलर जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२००७ - बेनझीर भूट्टो - पाकिस्तानच्या पंतप्रधान

१९७२ - लेस्टर बी. पिअर्सन कॅनडाचे १४ वे पंतप्रधान
१९२३ - गुस्ताव्ह आयफेल फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता

२६ डिसेंबर

घटना :-

२००४ - ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.

१९९७ - विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार

१९८२ - टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयरपुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.

१९७६ - कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.

१८९८ - मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.

जन्म :-

१९४८ - डॉ. प्रकाश आमटे - रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते

१९४१ - लालन सारंग रंगभूमीवरील कलाकार

१९३५ - डॉ. मेबल आरोळे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या

१९२५ - पं. कृष्णा गुंडोपंत तथा के. जी.गिंडे शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक

१९१७ - डॉ. प्रभाकर माचवे साहित्यिक

१९१४ - डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक

१९१४ - डॉ. सुशीला नायर स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या

१८९३ - माओ त्से तुंग आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते

१७९१ - चार्ल्स बॅबेज इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक

मृत्यू :-

२००६ - कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर अभिनेते

२००० - प्रा. शंकर गोविंद साठे नाटककार आणि साहित्यिक 

१९९९ - शंकरदयाळ शर्मा भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती

१९८९ - केशवा तथा के. शंकर पिल्ले व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक

१९७२ - हॅरी एस. ट्रूमन अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष
१५३० - बाबर पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक

२५ डिसेंबर

घटना :-

१९९१ - मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.

१९९० - वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी

१९७६ - आय. एन. एस. विजयदुर्गही युद्धनौका भारतीय नौदलात सामील

जन्म :-

१९४९ - नवाझ शरीफ पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान

१९३२ - प्रभाकर जोग व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार

१९२७ - पं. रामनारायण सुप्रसिद्ध सारंगीये

१९२६ - डॉ. धर्मवीर भारती हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार

१९२४ - अटलबिहारी बाजपेयी भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी

१९१९ - नौशाद अली संगीतकार

१९१८ - अन्वर सादात इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते

१९११ - बर्न होगार्थ अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ

१८७६ - बॅ. मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल

१८६१ - पण्डित मदन मोहन मालवीय बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक

१६४२ - सर आयझॅक न्यूटन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

मृत्यू :-

१९९८ - दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर नाटककार व दिग्दर्शक

१९९५ - डीन मार्टिन अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते

१९९४ - ग्यानी झैलसिंग भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री

१९७७ - चार्ली चॅपलिन अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार

१९७२ - चक्रवर्ती राजगोपालाचारी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक
१९५७ - प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक

समय दर्शक

सभासद व्हा