नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० जून

घटना:

१९९७ - ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

१९८६ - केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

१९७८ - अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

१९७१ - सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

१९६६ - कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६५ - भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९६० - काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४४ - मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्का बसला.


जन्म :

१९६९ - सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६६ - माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा

१९४३ - सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९२८ - कल्याणजी वीरजी शाह – ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार जोडीतील ज्येष्ठ बंधू

१४७० - चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा



मृत्यू :

१९९९ - कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – मराठी काव्यसृष्टीतील कवी 

१९९७ - राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक.

१९९४ - बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक

१९९२ - डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक 

१९१७ - दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय

२९ जून

घटना:

२००१ - ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर

२००१ - पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर

१९९५ - दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.

१९७६ - सेशेल्सला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८७१ - ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्यां१ना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.


जन्म :

१९४५ - चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५ व्या राष्ट्राध्यक्षा

१९३४ - कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक

१९०८ - प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज

१८९३ - प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक

१८९१ - डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक

१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक



मृत्यू :

२०१० - प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते.

२००३ - कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री

२००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार

१९९३ - विष्णुपंत जोग – गायक अभिनेते 

१९९२ - शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते 

१९८१ - दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक

१९६६ - दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार

१८९५ - थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक 

२८ जून

घटना:

१९९८ - संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कमविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्ना?स वर्षे पूर्ण झाली.

१९९७ - मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.

१९९४ - विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.

१९७८ - अमेरिकेतील सर्वोच्वी न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

१९७२ - दुसर्यात भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ

१८४६ - अॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.

१८३८ - इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.


जन्म :

१९७० - मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९३७ - डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक

१९३४ - रॉय गिलख्रिस्ट – वेस्ट इंडीजचे कसोटीपटू

१९२८ - बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक

१९२१ - नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री

१७१२ - रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार

१४९१ - हेन्री  (आठवा) – इंग्लंडचा राजा



मृत्यू :

२००० - विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक

१९९९ - रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार 

१९८७ - पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक

१९७२ - प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक

१८३६ - जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष 

२७ जून

घटना:

१९९६ - अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर

१९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

१९७७ - जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५४ - अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओबनिदन्स्क येथे सुरू झाले.

१९५० - अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.


जन्म :

१९३९ - राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार

१९१७ - खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज

१८८० - हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका

१८७५ - दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’

१८६४ - शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार

१८३८ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार.

१५५० - चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा

१४६२ - लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा



मृत्यू :

२००८ - फील्ड मार्शल सॅम माणेकशा

२००० - द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार 

१९९८ - होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल.

१९९६ - अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते

१८३९ - महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक

१७०८ - धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती

२६ जून

घटना:

२००० - पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

१९९९ - पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.

१९९९ - नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

१९७५ - पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.

१९७४ - नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ

१९७४ - ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

१९६८ - पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाकटन झाले.

१९६० - मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६० - सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१७२३ - रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.


जन्म :

१९५१ - गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९१४ - शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान

१८९२ - पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका

१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते

१८७४ - छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक

१८७३ - अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका

१८२४ - लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ

१७३० - चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ



मृत्यू :

२००५ - एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू

२००४ - यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता

२००१ - वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार

१९४३ - कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ

  ३६३ - रोमन सम्राट ज्यूलियनची हत्या 

२५ जून

घटना:

२००० - मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चलन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.

१९८३ - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.

१९७५ - पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.

१९७५ - मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९३४ - महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्नज झाला.

१९१८ - कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.


जन्म :

१९८६ - सई ताम्हनकर – अभिनेत्री

१९७५ - व्लादिमिर क्रामनिक – रशियन बुद्धीबळपटू

१९७४ - करिश्मा कपूर – अभिनेत्री

१९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान.

१९२४ - मदनमोहन – संगीतकार

१९०३ - एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार

१९०० - लॉर्ड लुई माउंटबॅटन – स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल



मृत्यू :

२००९ - मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता

२००० - रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या 

१९७९ - अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष 

१९२२ - सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी

२४ जून

घटना:

२००१ - ’आय. एन. एस. विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

१९९८ - अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर

१९८२ - कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.

१९४० - दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.

१९३९ - सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.


जन्म :

१९२८ - मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य

१९०८ - गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक.

१८९७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक.

१८६९ - दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे

१८६२ - श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक



मृत्यू :

१९९७ - संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका

२३ जून

घटना:

१९९८ - दुस-या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.

१९९६ - आवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्या  महिला पंतप्रधान होत.

१९७९ - इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.

१८९४ - पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.

१७५७ - प्लासीची लढाई : रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.


जन्म :

१९७२ - झिनेदिन झिदान – फ्रेन्च फूटबॉलपटू

१९१६ - सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू

१९१२ - अॅ१लन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ

१९०६ - वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे

१९०१ - राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक



मृत्यू :

१९९६ - रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९९४ - वसंत शांतारम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार 

१९९० -  हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.

१९८० - व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री

१९८० - राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन

१९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक

१९३९ - गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते

१८३६ - जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ

१७६१ - बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ 

२२ जून

घटना:
२०१४ - zpteacher.weebly.com या वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आले.

१९९४ - महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्या त महिलांना ३० टक्केल आरक्षण

१९७८ - जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अॅारिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

१९७६ - कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.

१९४१ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची  भेट घेतली.

१९४० - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

१९०८ - इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण

१८९७ - पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्या ला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

१७५७ - प्लासीची लढाई सुरू झाली.

१६३३ - गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.


जन्म :

१९८४ - गणेश पंढरीजी सतिमेश्राम - प्राथमिक शिक्षक

१९३२ - अमरिश पुरी – अभिनेता

१९०८ - डॉ. वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ

१८९६ - नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर – चित्रपट अभिनेते. 

१८८७ - ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ

१८०५ - जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर



मृत्यू :

१९९४ - अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९९३ - विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते, रंगभूमीवरील अभिनेते 

१९५५ - सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज

आपला चंद्रपूर


Picture
                   आज चंद्रपूर हे नाव प्रचलीत असलेला हा जिल्हा प्राचीन काळी लोकापूर या नावाने ओळखला जात असे. याचेच नामांतर काही काळानंतर इंद्रपूर आणि त्यानंतर चंद्रपूर असे झाले. ब्रिटीशांच्या कारकीर्दीत हा जिल्हा चांदा या नावाने ओळखला जाऊ लागला. सन १९६४ मध्ये चांदा हे नाव बदलून पुन्हा चंद्रपूर असे करण्यात आले. या प्रदेशावर ब-याच काळापर्यंत  हिंदू आणि बुद्ध राजाची सत्ता होती. या भागावर राज्य करीत असलेल्या वैरागडच्या मान राजाकडून नवव्या शतकात गोंड राजांनी सत्ता हस्तगत केली. सन १२४० ते १७५१ पावेतो म्हणजे येथे मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होईपर्यंत गोंड राजांचीच सत्ता होती. मराठे राजे रघूजी भोसले हे सन १८५३ मध्ये विनावारस मृत्यू पावल्यानंतर नागपूर प्रांतासहीत चंद्रपूर हे ब्रिटीश साम्राज्याला जोडण्यात आले.
                   सन १८७४ पासून चंद्रपूर जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा

शिक्षक मंच लाँच

शिक्षक मंच लाँच करण्यात आले.

समय दर्शक

सभासद व्हा