नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३१ ऑक्टोबर

घटना:

१९८४ - पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या

१९८४ - भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

१९६६ - दिल्ली उच्चं न्यायालयाची स्थापना

१९४१ - ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

१९२० - नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

१८८० - धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भनव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार

१८६४ - नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.



जन्म :

१९४६ - रामनाथ पारकर – क्रिकेटपटू

१८९५ - सी. के. नायडू – क्रिकेटपटू

१८७५ - सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न

१३९१ - एडवर्ड – पोर्तुगालचा राजा


मृत्यू :

२००९ - सुमती गुप्ते – अभिनेत्री 

२००५ - अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री.

१९८६ - आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका

१९८४ - इंदिरा गांधी - भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान.

१९७५ - सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक

१८८३ - मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक 

३० ऑक्टोबर

घटना:

२०१३ - सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.

१९९५ - कॅनडातील क्वे बेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

१९७३ - इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

१९६६ - शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

१९४५ - भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

१९२८ - लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्याt लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.

१९२० - सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.


जन्म :

१९६० - डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू

१९४९ - प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार

१९०९ - डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१८८७ - सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील

१७३५ - जॉन अॅबडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष


मृत्यू :

२०११ - अरविंद मफतलाल – उद्योगपती

१९९८ - विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक

१९९६ - प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते

१९९४ - सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री

१९९० - व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते

१९९० - विनोद मेहरा – अभिनेता

१९७४ - बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. 

२९ ऑक्टोबर

घटना:

२००८ - डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

२००५ - दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार

१९९९ - चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान

१९९७ - माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरन् ध् पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर

१९९७ - अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ जाहीर

१९९६ - स्वदेशात बनविलेली ‘कामिनी‘ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्क्म येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.

१९९६ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्यात तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड

१९९४ - विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ’होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर

१९६४ - टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

१९५८ - महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्नि पुरस्कार प्रदान

१९२२ - बेनिटो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी

१८९४ - महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना


जन्म :

१९७१ - मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९३१ - प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक

१८९७ - जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता


मृत्यू :

१९८८ - कमलादेवी चट्टोपाध्याय – स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या

१९८१ - दादा साळवी – अभिनेते 

१९७८ - वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे

१९३३ - पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ

१९११ - जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक

२८ ऑक्टोबर

घटना:

१९६९ - तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले

१९४० - दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.

१९२२ - बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

१९०४ - पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१८८६ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

१६३६ - अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना



जन्म :

१९६७ - ज्यूलिया रॉबर्टस – अमेरिकन अभिनेत्री

१९५८ - अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री

१९५६ - मोहम्मद अहमदिनेजाद – ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष

१९५५ - बिल गेटस – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक

१९५५ - इन्द्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी

१९३० - लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार

१८९३ - शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’

१८६७ - मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या.


मृत्यू :

१९४४ - हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला

१९०० - मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत

१८११ - राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर

१६२७ - जहांगीर – ४ था मुघल सम्राट 

२७ ऑक्टोबर

घटना:

१९९१ - तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९८६ - युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.

१९७१ - डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

१९६१ - मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५८ - पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.

१९४७ - जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८४ - इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू

१९७७ - कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६४ - मार्क टेलर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९५४ - अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका

१९४७ - डॉ. विकास आमटे – समाजसेवक

१९२३ - अरविंद मफतलाल – उद्योगपती

१९२० - के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती

१९०४ - जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक

१८७४ - भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी

१८५८ - थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते


मृत्यू :

२००१ - भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार

१९८७ - विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक

१९७४ - चक्रवर्ती रामानुजम – गणिती

१९६४ - वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक

१९३७ - ’संगीतरत्ना’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु

१७९५ - सवाई माधवराव पेशवा

१६०५ - अकबर – तिसरा मुघल सम्राट 

२६ ऑक्टोबर

घटना:

१९९९ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर

१९९४ - जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

१९६२ - धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

१९०५ - नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७४ - रवीना टंडन – अभिनेत्री

१९४७ - हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री

१९३७ - हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक

१९१९ - मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण

१९१६ - फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष

१९०० - इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक

१८९१ - वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक

१२७० - संत नामदेव



मृत्यू :

१९९१ - अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक

१९७९ - चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ. 

१९३० - डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

१९०९ - इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान 

२५ ऑक्टोबर

घटना:

२००९ - बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

१९९९ - दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्यां दा मिळाले.

१९९४ - ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६२ - युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५१ - स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.


जन्म :

१९४५ - अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका

१९३७ - डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक

१८८१ - पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार



मृत्यू :

२०१२ - जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते

२००९ - चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते

२००३ - पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ.

१९८० - अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार

१९५५ - पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक.

१६४७ - इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक 

२४ ऑक्टोबर

घटना:

२००० - थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९७ - सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

१९८४ - भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

१९७२ - दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.

१९६४ - उत्तर र्होसडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.

१९६३ - देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

१९४५ - संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

१९०९ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याआचा उत्सव साजरा केला.

१६०५ - मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.


जन्म :

१९७२ - रीमा लांबा ऊर्फ ’मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल

१९२६ - केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर

१९२१ - आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार

१९१४ - लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन

१९१० - ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री

१८६८ - भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते

१७७५ - बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा

१६३२ - अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ



मृत्यू :

२०१३ - प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक.

१९९५ - माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष 

१९९२ - अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक.

१९९१ - इस्मत चुगताई – उर्दू कथा व पटकथा लेखिका

१६०१ - टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले.

२३ ऑक्टोबर

घटना:

१९९७ - सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान

१९७३ - संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

१९४४ - दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

१८९० - हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.


जन्म :

१९४५ - शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते

१९२४ - ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट

१९२३ - दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक

१९०० - डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू

१८७९ - शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार

१७७८ - चन्नम्मा – कित्तूरची राणी


मृत्यू :

२०१२ - सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार

 १९२१ - जॉन बॉईड डनलॉप – स्कॉटिश संशोधक

 १९१५ - डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू

 १९१० - चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा

२२ ऑक्टोबर

घटना:

२००८ - भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.

१९९४ - भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर

१९६४ - फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.

१९६३ - पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

१९३८ - चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

१७९७ - बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.


जन्म :

१९४८ - माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज

१९४७ - दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक

१९४२ - रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार

१८७३ - तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत

१६९८ - नादिर शहा – पर्शियाचा सम्राट

१६८९ - जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा


मृत्यू :

२००० - अशोक मोतीलाल फिरोदिया – सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती 

१९९१ - ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व संस्थापक 

१९९८ - अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक

 १९७८ - नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते

 १९३३ - बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू

२१ ऑक्टोबर

घटना:

१९९९ - चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर

१९९२ - अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

१९८९ - जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

१९८७ - भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.

१९८३ - प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.

१९५१ - डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.

१९४५ - फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९४३ - सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना

१९३४ - जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.

१८५४ - फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.


जन्म :

१९४९ - बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान

१९४० - एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू

१९३१ - शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता

१९२० - धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन.

१९१७ - राम फाटक – गायक व संगीतकार

१८३३ - अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते


मृत्यू :

२०१२ - यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते

 १९९५ - लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका

 १९८१ - दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी

 १८३५ - मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार

 १४२२ - चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा

२० ऑक्टोबर

घटना:

२०११ - लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

२००५ - गणेश पंढरीजी सतिमेश्राम (जि.प.चंद्रपूर) शिक्षण सेवक पदावर रुजू

२००१ - रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर

१९९५ - ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर

१९९१ - उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

१९७१ - मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

१९७० - हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर

१९६९ - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना

१९६२ - चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.

१९५२ - केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

१९५० - कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.

१९४७ - अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९०४ - चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.


जन्म :

१९७८ - वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज

१९६३ - नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार

१९१६ - मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर

१८५५ - गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक.

१८९३ - जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१८९१ - सर जेम्स चॅडविक – नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक


मृत्यू :

२०११ - मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा

२०१० - पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू

२००९ - वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक

१९९९ - माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार

१९९६ - दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक 

१९८४ - पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ

१९७४ - कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार.

१९६४ - हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष

१९६१ - व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. 

१८९० - सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर

१९ ऑक्टोबर

घटना:

२००५ - मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

२००० - पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

१९९४ - रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार’ जाहीर.

१९९३ - पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर

१९७० - भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द

१९४४ - दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.

१९३५ - इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.

१८१२ - नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.

१२१६ - इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्रीइ हा राजेपदी आरुढ झाला.


जन्म :

१९६१ - अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता

१९५४ - प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.

१९३६ - शांताराम नांदगावकर – गीतकार

१९२५ - डॉ. वामन दत्तात्रय तथा ’वा. द.’ वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक

१९२० - पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ.

१९१० - सुब्रमण्यन चंद्रशेखर – नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.

१९०२ - दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक.


मृत्यू :

१९९५ - सलमा बेग ऊर्फ ’बेबी नाझ’- बाल कलाकार व नंतर सहाय्यक अभिनेत्री  

१९५० - विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक

१९३७ - अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ

१९३४ - विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक.

१२१६ - जॉन – इंग्लंडचा राजा

१८ ऑक्टोबर

घटना:

२००२ - कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.

१९७७ - २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.

१९६७ - सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.

१९२२ - ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना

१९१९ - राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.

१९०६ - महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.

१८७९ - थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना

१८६७ - सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.


जन्म :

१९५६ - मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू Website

१९५० - ओम पुरी – अभिनेता

१९३९ - ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी

१९२५ - इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक

१८६१ - ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार.

१८०४ - मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा


मृत्यू :

२००४ - वीरप्पन – चंदन तस्कर

१९९५ - ई. महमद – छायालेखक

१९९३ - मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री.

१९८७ - वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते.

१९८३ - विजय मांजरेकर – क्रिकेटपटू

 १९५१ - हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार

 १९३१ - थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक

 १९०९ - लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष

 १८७१ - चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक

१७ ऑक्टोबर

घटना :

१९९८ - आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्यात फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान

१९९६ - अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर

१९९४ - पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना ’डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक’ जाहीर

१९७९ - मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित

१९६६ - बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९४३ - बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

१९३४ - ’प्रभात’चा ’अमृतमंथन’ हा चित्रपट पुण्याच्या ’प्रभात’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.

१९३३ - अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आला.

१९३१ - माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.

१९१७ - पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.

१८३१ - मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.


जन्म :

१९७० - अनिल कुंबळे – भारतीय लेग स्पिनर

१९६५ - अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचा क्रिकेट कप्तान

१९५५ - स्मिता पाटील – अभिनेत्री

१९४७ - सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका

१९१७ - विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी

१८९२ - नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी

१८६९ - ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू

१८१७ - सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते


मृत्यू :

२००८ - रविन्द्र पिंगे – ललित लेखक

१९९३ - विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक

१९०६ - जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली

१८८७ - गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१८८२ - दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक.

१७७२ - अहमदशाह दुर्रानी (दुराणी) - अफगणिस्तानचा राज्यकर्ता

१६ ऑक्टोबर

घटना:

१९९९ - जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्नूतकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

१९८४ - आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९७५ - बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.

१९७३ - हेन्री  किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९६८ - हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान

१९५१ - पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

१९२३ - वॉल्ट डिस्नेप आणि त्याचा भाऊ रॉय डिस्ने  यांनी ’द वॉल्ट डिस्नेी कंपनी’ची स्थापना केली.

१९०५ - भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

१८६८ - डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्कच ब्रिटिशांना विकले.

१८४६ - डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१७९३ - फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्नीय मेरी अॅंइटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.

१७७५ - ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.


जन्म :

२००३ - कृत्तिका – नेपाळची राजकन्या

१९५९ - अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९४८ - हेमा मालिनी – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक

१९०७ - सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.
१८९६ - सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक

१८९० - अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ.

१८५४ - ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार

१८४१ - इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान

१६७० - बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती


मृत्यू :

२००२ - नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक

१९९७ - दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक

१९८१ - मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख

१९५१ - लियाकत अली खान  - पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान

१९५० - वि. गं. तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक 

१९४८ - माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. 

१९४४ - गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, ’प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक

१९०५ - पंत महाराज बाळेकुन्द्री – आध्यात्मिक गुरू

१५ ऑक्टोबर

घटना:

१९९७ - भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या ’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ’बुकर पुरस्कार’ मिळाला.

१९९३ - वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन, दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्नांषबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

१९३५ - टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन ’एअर इंडिया’ ही कंपनी अस्तित्त्वात आली.

१९१७ - पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.

१८८८ - गोपाळ गणेश आगरकरांच्या ’सुधारक’ पत्राची सुरूवात


जन्म :

१९६९ - पं. संजीव अभ्यंकर – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक

१९५७ - मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका

१९४९ - प्रणोय रॉय – पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक

१९३४ - एन. रामाणी – कर्नाटिक शैलीचे बासरीवादक

१९३१ - अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्न१ (१९९७).

१९२६ - नारायण गंगाराम सुर्वे – कवी

१९२० - मारिओ पुझो – अमेरिकन लेखक

१९०८ - जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ

१८८१ - पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक

१६०८ - इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक

१५४२ - बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट


मृत्यू :

२००२ - वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार

१९६१ - सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक.

१९४६ - हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी

१९३० - हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती

१९१८ - साई बाबा 

१९१७ - माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर

१७८९ - रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश

१४ ऑक्टोबर

घटना:

१९९८ - विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

१९८२ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.

१९८१ - अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्नीध मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

१९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

१९४७ - चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.

१९३३ - राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.

१९२० - ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.

१९१२ - मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर इसमाने खूनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले.


जन्म :

१९५५ - उस्ताद शाहिद परवेझ – इटावा घराण्याचे सतारवादक

१९३६ - सुभाष भेंडे – लेखक

१९३१ - निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक

१९२७ - रॉजर मूर – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता

१९२४ - वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक

१८९० - ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष

१८८२ - इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष 

१७८४ - फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा

१६४३ - बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट

१५४२ - अकबर – तिसरा मुघल सम्राट


मृत्यू :

२०१३ - मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते

२००४ - दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक

१९९९ - ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१९९८ - डॉ. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक

१९९७ - हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार

१९९४ - सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व.

१९९३ - लालचंद हिराचंद दोशी – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष, पद्मश्री (१९९२)

१९५३ - रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र

१९४७ - साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद, साहित्यिक

१९४४ - एर्विन रोमेल – जर्मन सेनापती

१९१९ - जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती

१३ ऑक्टोबर

घटना:

१९७० - फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९४६ - फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.

१९४४ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.

१९२९ - पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.

१९२३ - मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.

१८८४ - लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.


जन्म :

१९४८ - नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक

१९४१ - जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू

१९२५ - मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान

१९११ - अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते

१८७७ - भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित


मृत्यू :

२००१ - डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक

१९९५ - डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक

१९८७ - आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक

१९४५ - मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक

१९११ - मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या

१२४० - रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती 

१२ ऑक्टोबर

घटना:

२००२ - दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.

२००१ - संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नाून यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर

२००० - भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल ’सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार’ जाहीर

१९९८ - तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून ’इंटरनॅशनल वूमन मास्टर’ हा किताब मिळवला.

१९८८ - जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.

१९८३ - लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.

१९६८ - मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६० - संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.

१८७१ - भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.

१८५० - अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू

१४९२ - ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.


जन्म :

१९४६ - अशोक मंकड – क्रिकेटपटू

१९२२ - शांता शेळके – कवयित्री आणि गीतलेखिका.

१९२१ - जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, 

१९१८ - मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक

१९११ - विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक


मृत्यू :

१९९६ - रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक

 १९६७ - डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक.

१९६५ - पॉल हर्मन म्युलर –  स्विस रसायनशास्त्रज्ञ

१६०५ - बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट

११ ऑक्टोबर

घटना:

२००१ - ’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.

२००१ - सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.

१८५२ - ’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.


जन्म :

१९५१ - मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९४६ - विजय भटकर – संगणकतज्ञ  ’सी. डॅक’ या प्रगत संगणकीय विकसन केन्द्राचे संस्थापक.

१९४३ - कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू

१९४२ - अमिताभ बच्चणन – चित्रपट अभिनेता व निर्माता

१९३२ - सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक

१९३० - बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक

१९१६ - चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य

१९१६ - रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील ’यमुनाजळी खेळू ...’ या गाण्यासाठी प्रसिद्ध

१९०२ - ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान

१८७६ - चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.



मृत्यू :

२००२ - दीना पाठक – अभिनेत्री

१९९९ - रमाकांत कवठेकर – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिक प्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक 

१९९७ - विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य 

१९९६ - कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू

१९९४ - दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक 

 १९६८ - माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना ’राष्ट्रसंत’ असे संबोधले जाते.

१८८९ - जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक

१९८४ - खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज

१० ऑक्टोबर

घटना:

१९९८ - आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७५ - पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९६४ - जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६० - विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९५४ - आचार्य अत्रे निर्मित श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.

१९४४ - दुसरे महायुद्ध – ज्यूंचे शिरकाण - ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.

१९४२ - सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

१९१३ - पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.


जन्म :

१९५४ - रेखा – चित्रपट अभिनेत्री

१९१६ - डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक

१९१० - डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक

१९०९ - क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक

१९०६ - रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक.

१९०२ - के. शिवराम कारंथ – कन्नाड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत

१८९९ - कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी
१८७१ - शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक

१८४४ - बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष

१७३१ - हेन्री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ


मृत्यू :

२०११ - जगजीतसिंग – गझलगायक

२००८ - रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका

२००६ - सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका

२००० - सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.

१९८३ - रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले,

१९६४ - वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते.

१८९८ - मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक

९ ऑक्टोबर

घटना:

१९८१ - फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.

१९६२ - युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६० - विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८०६ - प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.


जन्म :

१९६६ - डेव्हिड कॅमरुन – इंग्लंडचे पंतप्रधान

१८७७ - पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक

१८७६ - पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक

१८५२ - एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ

१७५७ - चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा


मृत्यू :

१९९९ - मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.

१९९८ - जयवंत पाठारे – ‘आह‘, ‘अनाडी‘, ‘अनुराधा‘, ‘छाया‘, ‘सत्यकाम‘, ‘आनंद‘, ‘अभिमान‘, ’गोलमाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer) 

१९८७ - गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक

१९५५ - गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक.

 १९१४ - विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार.

१८९२ - रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.

८ ऑक्टोबर

घटना:

२००१ - सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

१९८२ - पोलंडने ’सॉलिडॅरिटी’ व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

१९६२ - अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९६२ - नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ’तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

१९५९ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.

१९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

१९३२ - ’इंडियन एअर फोर्स अॅरक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.


जन्म :

१९३५ - मिल्खा सिंग – ’द फ्लाइंग सिख’

१९२८ - नील हार्वे – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू

१९२६ - कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता

१९२२ - गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist).

१८९१ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.

१८५० - हेन्री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ


मृत्यू :

२०१२ - नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल

२०१२ - वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका

१९९८ - इंदिराबाई हळबे ऊर्फ ’मावशी' – देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा 

१९९६ - गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.

१९७९ - ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान

१९६७ - क्लेमंट अॅकटली – इंग्लंडचे पंतप्रधान

१९३६ - धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. 

१८८८ - महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक.

१३१७ - फुशिमी – जपानचा सम्राट

७ ऑक्टोबर

घटना :-

२००१ - सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

१९७१ - ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९४९ - जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना

१९३३ - पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.

१९१९ - महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.

१९१९ - के. एल. एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.

१९१२ - हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

१९०५ - पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न  होता.



जन्म :-

१९७८ - जहीर खान – जलदगती गोलंदाज

१९६० - आश्विनी भिडे-देशपांडे – शास्त्रीय गायिका

१९५२ - व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष

१९१४ - बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. 

१९१७ - विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक 

१९०७ - प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते 

१९०० - हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी 

१८८५ - नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक 

१८६६ - कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक

मृत्यू :-

१९९९ - उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, बालसाहित्यकार

१९९८ - भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री  

१९७५ - देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत 

 १८४९ - एडगर अॅळलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी 

 १७०८ - गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू

६ ऑक्टोबर

घटना:

२००७ - जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

१९८७ - फिजी प्रजासताक बनले.

१९८१ - इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या

१९७३ - इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्लाप केला.

१९६३ - पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

१९४९ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

१९२७ - ’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.

१९०८ - ऑस्ट्रियाने बोस्निरया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.


जन्म:

१९७२ - सलील कुलकर्णी – संगीतकार

१९४६ - विनोद खन्ना – अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार

१९४६ - टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक

१९४३ - डॉ. रत्नायकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक

१९३० - रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक

१९१४ - थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक

१९१३ - वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी.

१९१२ - डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक

१८९३ - मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्यांचच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला.

१७७९ - माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार


मृत्यू :

२००७ - बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री

 २००७ - एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत

 १९८१ - अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते

 १९७९ - महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते

 १९७४ - व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी

 १९५१ - विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक

 १८९२ - लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी

 १६६१ - गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू

५ ऑक्टोबर

घटना:

१९९८ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर

१९९५ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर

१९८९ - मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्चे न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

१९६२ - ’डॉ. नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.

१९५५ - पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्घानटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

१९१० - पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

१८६४ - एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार


जन्म :

१९७५ - केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री

१९३२ - माधव आपटे – क्रिकेटपटू

१९२३ - कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल

१९२२ - शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार

१९२२ - यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक

१८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ’हरिजन’चे संपादक होते.


मृत्यू :

२०११ - स्टीव्ह जॉब्ज – अॅकपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक

१९९७ - चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस

१९९२ - बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत

१९९१ - रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते

१९९० - राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी

१९८३ - अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक

१९८१ - भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक 

४ ऑक्टोबर

घटना:

१९८३ - नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

१९५७ - सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

१९५९ - सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या  भागाची छायाचित्रे घेतली.

१९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

१९४० - ’ब्रेनर पास’ येथे अॅनडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९२७ - गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१८२४ - मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.


जन्म:

१९३७ - जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री

१९३५ - अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक

१९२८ - ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक

१९१६ - धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक

१९१३ - सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका

१८२२ - रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष


मृत्यू :

१९८९ - ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट

१९८२ - सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.

१९६६ - अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक

 १९४७ - मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ

 १९२१ - ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.

 १८४७ - राजे प्रतापसिंह भोसले - छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत.

 १६६९ - रेंब्राँ – डच चित्रकार

३ ऑक्टोबर

घटना:

१९९५ - ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी  निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.

१९९० - पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.

१९३५ - जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.

१९३२ - इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१७७८ - ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.

१६७० - शिवाजी महाराजांनी दुसर्यांजदा सुरत लुटली.


जन्म:

१९४९ - जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक

१९२१ - रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९१९ - जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ

१९१४ - म. वा. धोंड – टीकाकार

१९०७ - नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक

१९०३ - स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ


मृत्यू :

२०१२ - केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर

१९९९ - अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक

१९५९ - दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक

१८९१ - एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती

१८६७ - एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक

२ ऑक्टोबर

घटना:

२००६ - निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

१९६९ - महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

१९६७ - थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च  न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

१९५८ - गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५५ - पेरांबूर येथे ’इन्टिग्रल कोच फॅक्टरी’ सुरू झाली

१९२५ - जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९०९ - रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.


जन्म:

१९७१ - कौशल इनामदार – संगीतकार व गायक

१९६८ - याना नोव्होत्नां – झेक लॉन टेनिस खेळाडू

१९४८ - पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका

१९४२ - आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री

१९२७ - पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक

१९०८ - गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार

१९०४ - लाल बहादूर शास्त्री – स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्नं’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.

 १८९१ - विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार
१८६९ - महात्मा गांधी - भारताचे राष्ट्रपिता

१८४७ - पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष

९७१ - गझनीचा महमूद


मृत्यू :

१९८५ - रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता

१९७५ - के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री

१९२७ - स्वांते अर्हे निअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ

१९०६ - राजा रविवर्मा – चित्रकार 

१ ऑक्टोबर

घटना:

२००५ - इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.

१९६० - नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५९ - भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५८ - भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

१९४६ - युनायटेड किंग्डममधे ’मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची ची स्थापना झाली.

१९४३ - दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.

१८९१ - स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना

१८८० - थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.

१८३७ - भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.

१७९१ - फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू


जन्म :-

१९३० - जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री

१९२८ - विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते

१९२४ - जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते

१९१९ - गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते.

१९१९ - मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी

१९०६ - सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक

१८९५ - लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान

१८८१ - विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक

१८४७ - अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या

मृत्यू :-

१९९७ - गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१ इंच)

१९३१ - शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार

१८६८ - मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा 

समय दर्शक

सभासद व्हा