नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० नोव्हेंबर

घटना :-

२००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हरया अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

१९९६ - ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्चा पुरस्कार आहे.

१९९५ - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मसंपल्याची अधिकृत घोषणा

१९६६ - बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९१७ - कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना

१८७२ - हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

जन्म :-

१९६७ - राजीव दिक्षीत सामाजिक कार्यकर्ता

१९४५ - वाणी जयराम पार्श्वगायिका

१९३५ - आनंद यादव लेखक

१९१० - कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब

१८७४ - विन्स्टन चर्चिल – ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी

१८५८ - जगदीशचंद्र बोस – भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ

१८३५ - मार्क ट्वेन विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार

१७६१ - स्मिथसन टेनांट – ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ

१६०२ - ऑटो व्हॉन गॅरिक – जर्मन पदार्थवैज्ञानिक

मृत्यू :-

२०१२ - इंदर कुमार गुजराल भारताचे १२ वे पंतप्रधान

२०१० - राजीव दिक्षीत सामाजिक कार्यकर्ता

१९९५ - वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक

१९७० - निना रिकी जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर
 
१९०० - ऑस्कर वाईल्ड आयरिश लेखक व नाटककार

२९ नोव्हेंबर

घटना :-

२००० - शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कूव विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कारजाहीर

२००० - दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कारजाहीर

१९९६ - नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्चक नागरी पुरस्कार गोल्डन ऑनरजाहीर

१९६३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.

१९४५ - युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

जन्म :-

१९७७ - युनिस खान पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९३२ - जाक्स शिराक फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती

१९२६ - प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊपाध्ये लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते

१९०७ - गोपीनाथ तळवलकर बालसाहित्यिक

१८६९ - अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक

मृत्यू :-

२००१ - जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्सचा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक

१९९३ - जहांगीर रतनजी दादाभॉय तथा जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्नज, उद्योगपती व वैमानिक

१९५९ - रियासतकारगोविंद सखाराम सरदेसाई मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार

१९३९ - माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते

१९२६ - कृष्णाजी नारायण आठल्ये ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार

२८ नोव्हेंबर

घटना :-

२००० - तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर

१९७५ - पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६७ - जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सारतार्यां चे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

१९६४ - नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

१९६० - मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९३८ - प्रभातचा माझा मुलगाहा चित्रपट रिलीज झाला. (कथा, पटकथा, संवाद: य. गो. जोशी, दिग्दर्शक: के. नारायण काळे, कलाकार: शाहू मोडक, शांता हुबळीकर, वसंत ठेंगडी, मा. छोटू)

१८२१ - पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

जन्म :-

१८७२ - रामकृष्णबुवा वझे गायक नट
१८५७ - अल्फान्सो (बारावा) स्पेनचा राजा

१८५३ - हेलन व्हाईट डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला

मृत्यू :-

२०१२ - झिग झॅगलर अमेरिकन लेखक

२००१ - अनंत काणे –  नाटककार
 
१९९९ - हनुमानप्रसाद मिश्रा – बनारस घराण्याचे सारंगीवादक

१९६८ - एनिड ब्लायटन –  इंग्लिश लेखिका

१९६७ - पांडुरंग महादेव तथा सेनापतीबापट सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक

१९६३ - त्र्यंबक शंकर शेजवलकर इतिहासकार व लेखक

१९६२ - कृष्ण चंद्र तथा के. सी.डे गायक, संगीत संयोजक व अभिनेते

१९५४ - एनरिको फर्मी इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ

१८९० - जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारकक्रांतिकारक विचारवंत 

२७ नोव्हेंबर

घटना :-

१९९५ - पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टरमधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेजहे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.

१९९५ - गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कारजाहीर

१९४४ - दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.

१८३९ - बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनची स्थापना



जन्म :-

१९८६ - सुरेश रैना क्रिकेटपटू

१९४० - ब्रूस ली अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ

१९१५ - दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी साहित्यिक

१९०७ - हरिवंशराय बच्चणन हिन्दी कवी

१८८१ - डॉ. काशीप्रसाद जायस्वाल प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ

१८७४ - चेम वाइझमॅन इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१८७० - दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस इतिहास संशोधक

१८५७ - सर चार्ल्स शेरिंग्टन – ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ

मृत्यू :-

२००८ - विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे ७ वे पंतप्रधान

२००० - बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर साहित्यिक, संशोधक

१९९४ - दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत

१९७८ - लक्ष्मीबाई केळकर राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका

१९७६ - गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार

१९५२ - शंकर रामचंद्र तथा अहिताग्नीराजवाडे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते
 
१७५४ - अब्राहम डी. मुआव्हर फ्रेन्च गणिती

२६ नोव्हेंबर : संविधान दिन

घटना :-

२००८ - पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबाने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.

१९९९ - विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्याo पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

१९९७ - अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्चव नागरी सन्मान जाहीर

१९६५ - अॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

१९४९ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

जन्म :-

१९७२ - अर्जुन रामपाल अभिनेता

१९५४ - वेल्लुपल्ली प्रभाकरन एल. टी. टी. ई. चा संस्थापक

१९३९ - टीना टर्नर अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका

१९२३ - राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर चित्रपट दिग्दर्शक

१९२१ - व्हर्गिस कुरियन भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक

१८९० - सुनीतिकुमार चटर्जी आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र

१८८५ - देवेन्द्र मोहन बोस –  भारतीय पदार्थवैज्ञानिक

मृत्यू :-

२००८ - हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे मुंबई पोलिस दलातील अधिकारी

२००१ - चंद्रकांत कृष्णाजी जगताप शिल्पकार 

१९९४ - भालजी पेंढारकर मराठी चित्रपटमहर्षी

१९८५ - यशवंत दिनकर पेंढारकर –  कवी

२५ नोव्हेंबर

घटना :-

२००० - सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मानजाहीर

१९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कारजाहीर

१९९४ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कारजाहीर

१९९१ - कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७५ - सुरीनामला (नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

जन्म :-

१९५२ - इम्रान खान पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकारणी

१९३९ - उस्ताद रईस खान – सतारवादक

१९२६ - रंगनाथ मिश्रा भारताचे २१ वे सरन्यायाधीश

१८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर चित्रकार

१८७९ - साधू वासवानी आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ

१८७२ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ख्यातनाम नाटककार व पत्रकार

मृत्यू :-

२०१३ - लीला पोतदार तथा लीलावती भागवत बालसाहित्यिका

१९९८ - परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर प्रशासक व मुत्सद्दी

१९८४ - यशवंतराव चव्हाण भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

१९७४ - यू. थांट संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस

१९६२ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी

१९६० - अनंत सदाशिव अळतेकर प्राच्यविद्यापंडित

१९२२ - पांडुरंग दामोदर गुणे प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक

समय दर्शक

सभासद व्हा