नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२८ फेब्रुवारी

घटना-

१९३५ - वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

१९२८ - डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो.

१९२२ - इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८४९ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किना-यामध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

जन्म-

१९५१ - करसन घावरी भारतीय क्रिकेटपटू

१९४८ - विदुषी पद्मा तळवलकर ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका

१९४४ - रविन्द्र जैन संगीतकार व गीतकार

१९४२ - ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक

१९२७ - कृष्णकांत भारताचे १० वे उपराष्ट्रपती

१९०१ - लिनस कार्ल पॉलिंग रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते

१८९७ - डॉ. शंकर दामोदर पेंडसे मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक

१८७३ - सर जॉन सायमन सायमन कमिशनया आयोगाचे अध्यक्ष

मृत्यू-

१९९९ - भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी औध संस्थानचे राजे 

१९९८ - राजा गोसावी अभिनेता

१९९५ - कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव  कथा, संवाद व गीतलेख

१९८६ - ओलोफ पाल्मे - स्वीडनचे २६ वे पंतप्रधान

१९६६ - उदयशंकर भट्ट आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार

१९६३ - डॉ. राजेन्द्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती

१९३६ - कमला नेहरू पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी

१९२६ - स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद

 

२७ फेब्रुवारी

घटना-

२००२ - मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

२००१ - जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्याह आकाशया देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी

१९९९ - पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक

१९५१ - अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९०० - ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना

१८४४ - डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

जन्म-

१९३२ - एलिझाबेथ टेलर ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री

१९२६ - ज्योत्स्ना देवधर मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या

१९१२ - विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार

१८९४ - कार्ल श्मिट जर्मन रसायनशास्त्रज्ञ

१८०७ - एच. डब्ल्यू. लाँगफेलो अमेरिकन नाटककार व कवी

मृत्यू-

१९९७ - श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर’ – गीतकार

१९३६ - इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह रशियन शास्त्रज्ञ

१९३१ - क्रांतिकारक चंदशेखर आझाद

१९८७ - अदि मर्झबान अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक 

१८९४ - कार्ल श्मिट जर्मन रसायनशास्त्रज्ञ

१८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

१७१२ - बहादूरशाह जफर (पहिला) मुघल सम्राट


२६ फेब्रुवारी

घटना-

१९९९ - आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या  मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड

१९९९ - आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेलआगीत भस्मसात झाले.

१९९८ - परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

१९९५ - बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.

१९८४ - इन्सॅट-१-इहा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित

१९७६ - वि. स. खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

१९२८ - बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.

जन्म-

१९३७ - मनमोहन देसाई चित्रपट निर्माते, दिग्दर्शक

१९२२ - मनमोहन कृष्ण चरित्र अभिनेता

१८७४ - सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी

१८६६ - हर्बर्ट डाऊ अमेरिकन उद्योगपती

१८२९ - लेव्ही स्ट्रॉस अमेरिकन उद्योजक

१८०२ - व्हिक्टर ह्यूगो जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक

१६३० - गुरू हर राय शिखांचे ७ वे गुरू

मृत्यू-

२०१० - चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य

२००४ - शंकरराव चव्हाण केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

२००३ - राम वाईरकर व्यंगचित्रकार

२००० - बा. म. तथा रावसाहेबगोगटे बेळगाव येथील उद्योगपती 

१९६६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक

१९३७ - एल. के. अनंतकृष्ण अय्यर मानववंशशास्त्रज्ञ

१८८६ - नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक

१८७७ - मेजर थॉमस कॅन्डी कोशकार व शिक्षणतज्ञ

२५ फेब्रुवारी

घटना-

१९९६ - स्वर्गदारातील तार्यासला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्यावचे कुसुमाग्रज ताराअसे नामकरण केले.

१९८६ - जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

१९६८ - मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४५ - दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.

१९४५ - दुसरे महायुद्ध तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३५ - फॉक्स मॉथविमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.

१८१८ - ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

१५१० - पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

जन्म-

१९७४ - दिव्या भारती हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री

१९४८ - डॅनी डेंग्झोप्पा चित्रपट अभिनेते

१९४३ - जॉर्ज हॅरिसन– ’बीटल्सचा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक

१८९४ - अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत

१८४० - विनायक कोंडदेव ओक बालवाङ्‌मयकार

मृत्यू-

२००१ - सर डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर

१९९९ - ग्लेन सीबोर्ग अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ

१९८० - गिरजाबाई महादेव केळकर लेखिका व नाटककार 

१९७८ - डॉ. प. ल. वैद्य प्राच्यविद्यासंशोधक

१९६४ - शांता आपटे चित्रपट अभिनेत्री

१९२४ - सर परशुरामभाऊ पटवर्धन - जमखिंडीचे संस्थानिक

१५९९ - संत एकनाथ

२४ फेब्रुवारी

घटना-

२०१० - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

१९८७ - इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ - एया तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

१९६१ - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

१९५२ - कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

१९४२ - व्हॉइस ऑफ अमेरिकाया रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

१९३८ - ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

१९२० - नाझी पार्टीची स्थापना झाली.

१९१८ - इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८२२ - जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घामटन झाले.

१६७० - राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म

जन्म-

१९५५ - स्टीव्ह जॉब्ज अॅचपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक

१९४८ - जे. जयललिता राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री

१९३९ - जॉय मुकर्जी चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक

१९२४ - तलत महमूद पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा

१६७० - राजाराम मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे चिरंजीव

मृत्यू-

२०११ - अनंत पै ऊर्फ अंकल पै’ – ’अमर चित्र कथाचे जनक

१९९८ - ललिता पवार अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या

१९८६ - रुक्मिणीदेवी अरुंडेल भरतनाट्यम नर्तिका

१९७५ - निकोलाय बुल्गानिन सोविएत युनियनचे अध्यक्ष

१८१५ - रॉबर्ट फुल्टन अमेरिकन अभियंते व संशोधक

१८१० - हेन्रीत कॅव्हँडिश ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ

 

२३ फेब्रुवारी

घटना-

२००० - संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर

१९९७ - रशियाच्या मीरया अंतराळस्थानकामधे आग लागली.

१९९६ - कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ

१९६६ - सीरियात लष्करी उठाव झाला.

१९५२ - संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

१९४७ - आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना

१९४५ - दुसरे महायुद्ध इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

१९४५ - दुसरे महायुद्ध अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.

१९४५ - दुसरे महायुद्ध पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.

१९४५ - दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.

१९४१ - डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.

१७३९ - चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.

१४५५ - पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबलप्रकाशित झाले.

जन्म-

१९६५ - हेलेना सुकोव्हा झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू

१९६५ - अशोक कामटे मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर

१९५७ - येरेन नायडू तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते

१९१३ - प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार जादूगार

१६३३ - सॅम्युअल पेपिस विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक

मृत्यू-

२००४ - सिकंदर बख्त केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते

२००४ - विजय आनंद हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

२००० - वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक 

१९९८ - रमण लांबा क्रिकेटपटू

१९६९ - मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला चित्रपट अभिनेत्री

१९४४ - लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ

१९०४ - महेन्द्र लाल सरकार होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक

१७९२ - सर जोशुआ रेनॉल्ड्स ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष

१७७७ - कार्ल फ्रेड्रिक गाऊस जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

समय दर्शक

सभासद व्हा