नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३१ मार्च

घटना :-

२००१ - सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

१९७० - १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

१९६६ - रशियाने ल्यूना-१०हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

१९६४ - मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

१९०१ - पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्याहसाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

१८८९ - आयफेल टॉवरचे उद्घा टन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

१८६७ - डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

१६६५ - मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

जन्म :-

१९३८ - शीला दिक्षीत दिल्लीच्या मुख्यमंत्री

१८७१ - कर्नाटकसिंहगंगाधर बाळकृष्ण देशपांडे स्वातंत्र्यसैनिक

१८६५ - आनंदीबाई गोपाळराव जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

१८४३ - बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेबकिर्लोस्कर नाटककार

१५९६ - रेनें देंकार्त फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक

१५१९ - हेन्रीद (दुसरा) फ्रान्सचा राजा

१५०४ - गुरू अंगद देव शिखांचे दुसरे गुरू

मृत्यू :-

२००४ - गुरू चरणसिंग तोहरा अकाली दलाचे नेते

२००४ - तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – चित्र व शिल्पकलेतील दिग्गज

१९७२ - महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी’ – अभिनेत्री

१९१३ - जे. पी. मॉर्गन अमेरिकन सावकार

३० मार्च

घटना :-

१९४४ - दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९२९ - भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१८५६ - पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१८४२ - अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१७२९ - थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१६६५ - पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला.

जन्म :-

१९४२ - वसंत आबाजी डहाके भाषातज्ज्ञी, कोशकार, लेखक आणि कवी

१९०८ - देविका राणी अभिनेत्री

१९०६ - जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती

१८९९ - शरदेंन्दू बंदोपाध्याय बंगाली लेखक

१८९५ - निकोलाय बुल्गानिन सोविएत युनियनचे अध्यक्ष

१८५३ - व्हिन्सेंट व्हॅन गॉग डच चित्रकार

मृत्यू :-

२००२ - आनंद बक्षी गीतकार

१९८९ - गजानन वासुदेव तथा ग. वा.बेहेरे – संपादक व साहित्यिक

१९७६ - रघुवीर मूळगावकर चित्रकार

१९६९ - वासुदेव गोविंद मायदेव कवी व समाजसेवक

१९५२ - जिग्मे वांगचुक भूतानचे २रे राजे

२९ मार्च

घटना :-

१९८२ - एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

१९७३ - व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९६८ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना

१९३० - प्रभातचा खूनी खंजिरहा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१८५७ - बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.

१८४९ - ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

जन्म :-

१९४८ - नागनाथ कोतापल्ले साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

१९४३ - जॉन मेजर इंग्लंडचे पंतप्रधान

१९३० - अनिरुद्ध जगन्नाथ मॉरिशसचे पंतप्रधान

१९२९ - उत्पल दत्त रंगभूमी आणि चित्रपट कलाकार

१९२६ - पांडुरंग लक्ष्मण तथा बाळगाडगीळ अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक

१८६९ - सर एडविन लुटेन्स दिल्लीचे नगररचनाकार

मृत्यू :-

१९९७ - पुपुल जयकर सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या

१९७१ - धीरेंद्रनाथ दत्ता बांगलादेशी राजकारणी

१९६४ - शंकर नारायण तथा वत्सजोशी इतिहाससंशोधक

२८ मार्च

घटना :-

१९९८ - सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅ्डव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१००००हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.

१९९२ - उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्नेहा सर्वोच्च० नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

१९७९ - अमेरिकेतील थ्री माईल आयलंडया बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.

१९४२ - रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीगची स्थापना केली.

१९३० - तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणिअंकारा अशी करण्यात आली.

१८५४ - क्रिमियन युद्ध फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

१७३७ - बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

जन्म :-

१९६८ - नासिर हुसैन इंग्लिश क्रिकेटपटू

१९२५ - राजा गोसावी अभिनेता

१८६८ - मॅक्झिम गॉर्की रशियन लेखक

मृत्यू :-

२००० - शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख

१९९२ - आचार्य सम्राट आनंदऋषीजी स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू

१९६९ - ड्वाईट आयसेनहॉवर अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक

१९४१ - व्हर्जिनिया वूल्फ ब्रिटिश लेखिका

१५५२ - गुरू अंगद देव शिखांचे दुसरे गुरू

२७ मार्च

घटना :-

२००० - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषणपुरस्कार जाहीर

१९९२ - पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार' प्रदान

१९७७ - तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅसम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे. खराब हवामान व पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली.

१९६६ - २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत 'पिकल्स' नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९५८ - निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१८५४ - क्रिमियन युद्ध इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१७९४ - अमेरिकन नौदलाची स्थापना झाली

१६६७ - शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचा महंमद कुली खान झाला.

जन्म :-

१९०१ - कार्ल बार्क्स –  हास्यचित्रकार

१८४५ - विलहेम राँटजेन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१७८५ - लुई (सतरावा) फ्रान्सचा राजा

मृत्यू :-

१९९७ - भार्गवराम आचरेकर संगीत नाटकातील अभिनेते व गायक

१९९२ - प्रा. शरच्चंसद्र वासुदेव चिरमुले साहित्यिक
१९६८ - युरी गागारीन पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर

१९६७ - जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की –  झेक रसायनशास्त्रज्ञ
१९५२ - काइचिरो टोयोडा टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक

१८९८ - सर सय्यद अहमद खान भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते

२६ मार्च

घटना :-

२०१३ - त्रिपूरा उच्चघ न्यायालयाची स्थापना

२००० - ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

१९७९ - अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या

१९७४ - गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपकोआंदोलनाची सुरूवात.

१९७२ - नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

१९४२ - इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह

१९४२ - ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

१९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला.

१९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.

१५५२ - गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

जन्म :-

१९८५ - प्रॉस्पर उत्सेया झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू

१९०९ - बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतकचे पहिले संपादक

१९०७ - महादेवी वर्मा हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामाया काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

१८७५ - सिंगमन र्हीम दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१८७४ - रॉबर्ट फ्रॉस्ट अमेरिकन कवी

मृत्यू :-

२०१२ - माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी

२००८ - बाबुराव बागूल दलित साहित्यिक

२००३ - गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या

१९९९ - आनंद शंकर प्रयोगशील संगीतकार

१९९७ - नवलमल फिरोदिया गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती

१९९६ - के. के. हेब्बर चित्रकार

१९९६ - डेव्हिड पॅकार्ड ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक
१८२७ - लुडविग व्हान बीथोव्हेन - कर्णबधिर संगीतकार

२५ मार्च

घटना :-

२०१३ - मणिपूर उच्चा न्यायालयाची स्थापना

२०१३ - मेघालय उच्चा न्यायालयाची स्थापना

२००० - १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

१९९७ - जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९२९ - लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

१८९८ - शिवरामपंत परांजपे यांचे काळहे साप्ताहिक सुरू झाले.

१६५५ - क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.

जन्म :-

१९५६ - मुकूल शिवपुत्र ग्वाल्हेर घराण्याचे गायक

१९४७ - सर एल्ट्न जॉन इंग्लिश संगीतकार व गायक

१९३३ - वसंत गोवारीकर शास्त्रज्ञ

१९३२ - वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे लेखक व कथाकथनकार

मृत्यू :-

१९९३ - मधुकर केचे साहित्यिक

१९९१ - वामनराव सडोलीकर जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक

१९७५ - फैसल सौदी अरेबियाचा राजा
१९४० - उपन्यास सम्त्राटरजनीकांत बर्दोलोई आसामी कादंबरीकार

२४ मार्च

घटना :-

२००८ - भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

१९९८ - टायटॅनिकचित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

१९९३ - शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९७७ - स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

१९२९ - लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन

१९२३ - ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१६७७ - दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१३०७ - देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

जन्म :-

१९५१ - टॉमी हिल्फायगर अमेरिकन फॅशन डिझायनर

१९३० - स्टीव्ह मॅकक्वीान हॉलिवूड अभिनेता

१७७५ - मुथुस्वामी दीक्षीतार तामिळ कवी व संगीतकार

मृत्यू :-

२००७ - श्रीपाद नारायण पेंडसे मराठी कथालेखक व कादंबरीकार

१९०५ - ज्यूल्स व्हर्न फ्रेन्च लेखक

१८८२ - एच. डब्ल्यू. लाँगफेलो अमेरिकन नाटककार व कवी

१८४९ - योहान वुल्फगँग डोबेरायनर जर्मन रसायनशास्त्रज्ञ

समय दर्शक

सभासद व्हा