नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० एप्रिल

घटना :-

२०१३ - राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले:

पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर, उद्योजक आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खाँ, शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई, विनोदी कलाकार जसपाल भट्टी (मरणोत्तर), अभिनेते राजेश खन्ना (मरणोत्तर)

पद्मश्री नाना पाटेकर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, डिझायनर रितू कुमार, ऑलिम्पीक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि विजयकुमार

१९४६ - राष्ट्रसंघ (League of Nations) ही संस्था विसर्जित करण्यात आली. पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रुपांतर झाले.

१९४५ - दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

१९३९ - अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा करण्यात आला.

१७७० - प्रसिद्ध दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

जन्म :-

१९५० - चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

१९३९ - सईदुद्दीन डागर ध्रुपद गायक

१९१४ - गोपीनाथ मोहंती ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक

१८९६ - ह. भ. प. शंकर वामन तथा सोनोपंतदांडेकर तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते

१८८९ - अॅ८डॉल्फ हिटलर नाझी हुकुमशहा

मृत्यू :-

१९७० - शकील बदायूँनी गीतकार आणि शायर

१९६० - अमल ज्योती तथा पन्नाीलालघोष बासरीवादक व संगीतकार

१९३८ - भारताचार्यचिंतामणराव वैद्य न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक
१९१८ - कार्ल ब्राऊन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१९ एप्रिल

घटना :-

१९७५ - आर्यभट्टहा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला.

१९७१ - सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.

१९५६ - गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

१९४८ - ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९४५ - सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१५२६ - मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.

जन्म :-

१९८७ - मारिया शारापोव्हा रशियन लॉनटेनिस खेळाडू

१९५७ - मुकेश अंबानी उद्योगपती

१९३३ - डिकी बर्ड ख्यातनाम क्रिकेट पंच

१९१२ - ग्लेन सीबोर्ग अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ

१८९२ - ताराबाई मोडक शिक्षणतज्ञ
१८६८ - पॉल हॅरिस रोटरी क्लबचे संस्थापक

मृत्यू :-

२०१० - मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष लेखक व टीकाकार

२००९ - अहिल्या रांगणेकर मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या

२००८ - सरोजिनी बाबर लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी

१९९३ - डॉ. उत्तमराव पाटील स्वातंत्र्यसैनिक
१९७४ - आयुब खान फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष

१९५५ - जिम कॉर्बेट ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक

१९१० - अनंत कान्हेरे क्रांतिकारक

१९०६ - पिअर क्यूरी नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
१८८२ - चार्ल्स डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
 
१८८१ - बेंजामिन डिझरेली इंग्लंडचे पंतप्रधान

१८ एप्रिल

घटना :-

२००१ - भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्या ने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण

१९७१ - एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोकशाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.

१९५४ - गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

१९५० - आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

१९३६ - पेशव्यांची राजधानी असणार्याथ पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

१९३० - क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

१९३० - आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

१९२४ - सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

१९२३ - पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना. हा राज्यातील पहिला शिवपुतळा. या पुतळ्याचे अनावरण मंदिराचे देणगीदार दिवंगत गणेश गोखले यांचे चिरंजीव डॉक्टर महादेव गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

१९१२ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथियाहे जहाज न्यूयॉर्कला पोचले

१८९८ - जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी

१८५३ - मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

१८३१ - यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाची स्थापना झाली.

१७२० - [चैत्र व. ८] शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्हा डनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.

१७०३ - औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१३३६ - हरिहर व बुक्कव यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

जन्म :-

१९५८ - माल्कम मार्शल वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९५६ - पूनम धिल्लन अभिनेत्री

१९१६ - ललिता पवार अभिनेत्री

१८५८ - महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – (स्त्रीशिक्षण व विधवा विवाह) समाजसुधारक
१७७४ - सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म

मृत्यू :-

२००२ - शरद दिघे महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष 

२००२ - थोर हेअरडल नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक

१९९९ - रघूवीर सिंह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार

१९९५ - पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्र अभ्यासक 

१९७२ - डॉ. पांडुरंग वामन काणे विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक

१९६६ - जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ

१९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१८९८ - दामोदर हरी चापेकर यांना फाशी
१८५९ - सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्याटोपे 

१७ एप्रिल

घटना :-

२००१ - अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉतलॉजी मधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कारजाहीर

१९७५ - ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.

१९५२ - पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली.

१९५० - बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

१९४६ - सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

१९४१ - दुसरे महायुद्ध युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

जन्म :-

१९७७ - दिनेश मोंगिया क्रिकेटपटू

१९७२ - मुथैय्या मुरलीधरन श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६१ - गीत सेठी बिलीयर्डसपटू

१९५१ - बिंदू चित्रपट अभिनेत्री

१९१६ - सिरीमाओ बंदरनायके श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान

१८९७ - निसर्गदत्त महाराज अद्वैत तत्त्वज्ञानी

१८९१ - यशवंत रामकृष्ण दाते कोशकार
१८३७ - जे. पी. मॉर्गन अमेरिकन सावकार

१४७८ - संत सूरदास हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य

मृत्यू :-

२०११ - विनायक आदिनाथ तथा वि. आ.बुवा विनोदी साहित्यिक

२००४ - सौंदर्या कन्न, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री

२००१ - डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द.वर्तक वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक

१९९८ - चित्रपट निर्माते विजय सिप्पी (वय ५५) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

१९९७ - बिजू पटनायक ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री

१९७५ - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ

१९४६ - व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी
१७९० - बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी

१६ एप्रिल

घटना :-

१९९९ - चालकरहित निशांतविमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्या) त्रिशूलक्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी

१९९५ - देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नां चा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयरहा पुरस्कार प्रदान

१९७२ - केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९४८ - राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना

१९२२ - मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१८५३ - भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र जी. आय. पी. हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली.

जन्म :-

१९७८ - लारा दत्ता मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)

१९७२ - कोंचिता मार्टिनेझ स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू

१९६३ - सलीम मलिक पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९३४ - रामचंद्र दामोदर तथा राम नाईक –  भाजपचे नेते

१८८९ - चार्ली चॅपलिन अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार

१८६७ - विल्बर राईट – ऑर्व्हिल राईटसह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते

मृत्यू :-

२००० - दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ शाहू महाराजांचे चरित्रकार

१९९५ - रमेश टिळेकर अभिनेते व वकील 

१९६६ - जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस
१८५० - मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका

१७५६ - जॅक्स कॅसिनी फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ

१५ एप्रिल

घटना :-

१९९७ - मक्के्पासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

१९४० - दुसरे महयुद्ध नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.

१८९२ - जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

१६७३ - मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

जन्म :-

१९३२ - सुरेश भट कवी

१९२२ - हसरत जयपुरी गीतकार

१९१२ - मल्हार सदाशिव तथा बाबूरावपारखे उद्योजक व वेदाभ्यासक

१९१२ - किम सुंग (दुसरे) उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष

१८९४ - निकिता क्रूश्चेव्ह सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष

१८९३ - नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक

१७४१ - चार्ल्स विल्सन पील अमेरिकन चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक

१७०७ - लिओनार्ड ऑयलर स्विस गणितज्ञ

१४६९ - गुरू नानक देव शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू

१४५२ - लिओनार्डो डा विंची इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२०१३ - वि. रा. करंदीकर संत साहित्याचे अभ्यासक

१९९५ - पंडित लीलाधर जोशी तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री 

१९९० - ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री

१९८० - जेआँ-पॉल सार्त्र फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ

१९१२ - एडवर्ड जे. स्मिथ आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान

१८६५ - अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन
१७९४ - मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत’ – पंडीतकवी

समय दर्शक

सभासद व्हा