नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० सप्टेंबर

घटना :-

२००० - देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे ’हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर

१९९८ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना 'शांतिस्वरुप भटनागर' पुरस्कार जाहीर

१९९४ - गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’दादासाहेबफाळके पुरस्कार’ प्रदान

१९९३ - लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.

१९६१ - दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्न०ई) येथे खेळला गेला.

१९४७ - पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९३५ - हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

१८९५ - फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

१३९९ - हेन्रीस (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

जन्म :-

१९८० - मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू

१९७२ - शंतनु मुकर्जी ऊर्फ ’शान’ – पार्श्वगायक

१९३३ - प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक

१९६१ - चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू

१९२२ - हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक

१९०० - एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री

मृत्यू  :-

२००१ - केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन

१९९८ - चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या

१९९२ - गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्म य सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.

१९८५ - चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक
१६९४ - मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर

२९ सप्टेंबर

घटना :-

२०१२ - अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००८ - ’लेहमन ब्रदर्स’ आणि ’वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ’डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.

१९९१ - हैतीमधे लष्करी उठाव

१९६३ - ’बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.

१९४१ - दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

१९१७ - मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची (IES) पहिली शाळा ’किंग जॉर्ज हायस्कुल’ सुरू झाली.

१९१६ - जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.

जन्म :-

१९७८ - मोहिनी भारद्वाज – अमेरिकन कसरतपटू (Gymnast)

१९५७ - ख्रिस ब्रॉड – इंग्लिश क्रिकेटपटू व पंच

१९४३ - लेक वॉलेसा – नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष

१९३४ - लान्स गिब्ज – वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज

१९३२ - हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू

१९३२ - महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता

१९२८ - ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

१९२५ - डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक

१९०१ - एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ

१८९० - ल. गो. तथा नानाशास्त्री दाते – पंचांगकर्ते 

मृत्यू  :-

१९९१ - उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक

१९१३ - रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक

१८३३ - फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा
  ८५५ - लोथार (पहिला) – रोमन सम्राट

२८ सप्टेंबर

घटना :-

२००० - विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर

१९९९ - महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर

१९६० - माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९५० - इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९३९ - दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९२८ - सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.

जन्म :-

१९८२ - अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय

१९८२ - रणबीर कपूर – अभिनेता

१९४७ - शेख हसीना – बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान

१९४६ - माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान

१९२९ - लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्न , दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण

१९०९ - पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते

१९०७ - भगत सिंग – क्रांतिकारक

१८९८ - शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महसभेचे अध्यक्ष, देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला

१८०३ - प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ

मृत्यू  :-

२०१२ - ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

२०१२ - माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)

२००४ - डॉ. मुल्कराज आनंद – लेखक

२००० - श्रीधरपंत दाते – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते

१९९२ - मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे

१९८९ - फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष

१९५६ - विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक

१९५३ - एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
१८९५ - लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

२७ सप्टेंबर

घटना :-

१९९६ - तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हा नुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.

१९६१ - सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५८ - मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.

१९४० - दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.

१९२५ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

१८२१ - मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

जन्म :-

१९८१ - लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू

१९८१ - ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९६२ - गेव्हिन लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९५३ - माता अमृतानंदमयी

१९३२ - यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते

१९०७ - वामनराव देशपांडे – संगीत समीक्षक

१६०१ - लुई (तेरावा) – फ्रान्सचा राजा



मृत्यू  :-

२००८ - महेन्द्र कपूर – पार्श्वगायक

२००४ - शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका

१९९९ -  डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका

१९९२ - अनुताई वाघ – समाजसेविका

१९७५ - तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ

१९७२ - एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ

१९२९ - शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
१८३३ - राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.

२६ सप्टेंबर

घटना :-

१९९० - रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८४ - युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

१९७३ - ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्यास ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

१९६० - फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

१९५० - इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

जन्म :-

१९८१ - सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९४३ - इयान चॅपेल – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कप्तान

१९३२ - डॉ. मनमोहन सिंग – भारताचे १३ वे पंतप्रधान, अर्थतज्ञ?

१९३१ - विजय मांजरेकर – क्रिकेटपटू

१९२३ - देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता

१८९४ - आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक

१८८८ - टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते

१८५८ - मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते

१८४९ - इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ

१८२० - इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नां्मुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला.

मृत्यू  :-

२००८ - पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर

२००२ - राम फाटक – गायक व संगीतकार

१९९६ - विद्याधर गोखले – नाटककार व संपादक

१९८९ - हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता

१९८८ - पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व

१९७७ - उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली.

१९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक
१९०२ - लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक

समय दर्शक

सभासद व्हा