नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ जानेवारी

घटना :-
२००० - संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२००० - पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
१९९८ - डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
१९८९ - मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
१९५४ - राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्नद’ पुरस्कारांची स्थापना केली.
१९४५ - दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९४२ - दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
१९३६ - मध्य प्रदेश उच्च. न्यायालयाची स्थापना
१९०५ - मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.
१८८५ - पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
१८८१ - लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
१७५७ - प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
जन्म :-
१९६० - रमण लांबा – क्रिकेटपटू
१९५९ - किर्ती आझाद – क्रिकेटपटू
१९३२ - हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष
१९२० - आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक
मृत्यू  :-
२००२ - अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी
१९९९ - विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या
१९८९ - सफदर हश्मी – लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
१९४४ - महर्षि विठ्ठल रामजी शिंदे –  समाजसुधारक
१९३५ - मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक
१३१६ - अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान

१ जानेवारी

घटना :-

२००० - ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
 
१९३२ - डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
 
१९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
 
१९०८ - ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
 
१९०० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
 
१८९९ - क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
 
१८८३ - पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
 
१८८० - विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
 
१८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
 
१८४८ - महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
 
१८४२ - बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
 
१८०८ - यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
 
१७५६ - निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.
 

जन्म :-

१९५१ - नाना पाटेकर – अभिनेता

१९५० - दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका

१९४३ - रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक

१९४१ - गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार

१९३६ - राजा राजवाडे – साहित्यिक

१९२८ - डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक

१९२३ - उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका

१९१८ - शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

१९०२ - कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान - वैज्ञानिक

१९०० - श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक

१८९४ - सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१८९२ - महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक

१८७९ - इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक

१६६२ - बाळाजी विश्वनाथ भट - पहिला पेशवा


मृत्यू  :-


२००९ - रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीत विद्वान

१९८९ - दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार

१९७५ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार

१९५५ - डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक

१९४४ - सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार

१८९४ - हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ 

१७४८ - योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ

१५१५ - लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा

समय दर्शक

सभासद व्हा