नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२५ मार्च

घटना :-

२०१३ - मणिपूर उच्चा न्यायालयाची स्थापना

२०१३ - मेघालय उच्चा न्यायालयाची स्थापना

२००० - १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

१९९७ - जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९२९ - लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

१८९८ - शिवरामपंत परांजपे यांचे ’काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.

१६५५ - क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.

जन्म :-

१९५६ - मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक

१९४७ - सर एल्ट्न जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक

१९३३ - वसंत गोवारीकर – शास्त्रज्ञ

१९३२ - वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार

मृत्यू :-

१९९३ - मधुकर केचे – साहित्यिक

१९९१ - वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक

१९७५ - फैसल – सौदी अरेबियाचा राजा
१९४० - ’उपन्यास सम्त्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार

२४ मार्च

घटना :-

२००८ - भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

१९९८ - ‘टायटॅनिक‘ चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

१९९३ - शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९७७ - स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

१९२९ - लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन

१९२३ - ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१६७७ - दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१३०७ - देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

जन्म :-

१९५१ - टॉमी हिल्फायगर – अमेरिकन फॅशन डिझायनर

१९३० - स्टीव्ह मॅकक्वीान – हॉलिवूड अभिनेता

१७७५ - मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार

मृत्यू :-

२००७ - श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी कथालेखक व कादंबरीकार

१९०५ - ज्यूल्स व्हर्न – फ्रेन्च लेखक

१८८२ - एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी

१८४९ - योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ

समय दर्शक

सभासद व्हा