नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२७ मार्च

घटना :-

२००० - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ’राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर

१९९२ - पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार' प्रदान

१९७७ - तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅसम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे. खराब हवामान व पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली.

१९६६ - २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत 'पिकल्स' नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९५८ - निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१८५४ - क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१७९४ - अमेरिकन नौदलाची स्थापना झाली

१६६७ - शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचा महंमद कुली खान झाला.

जन्म :-

१९०१ - कार्ल बार्क्स –  हास्यचित्रकार

१८४५ - विलहेम राँटजेन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१७८५ - लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा

मृत्यू :-

१९९७ - भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक

१९९२ - प्रा. शरच्चंसद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक
१९६८ - युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर

१९६७ - जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की –  झेक रसायनशास्त्रज्ञ
१९५२ - काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक

१८९८ - सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते

२६ मार्च

घटना :-

२०१३ - त्रिपूरा उच्चघ न्यायालयाची स्थापना

२००० - ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

१९७९ - अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या

१९७४ - गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात.

१९७२ - नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

१९४२ - इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह

१९४२ - ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

१९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला.

१९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.

१५५२ - गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

जन्म :-

१९८५ - प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू

१९०९ - बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक

१९०७ - महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

१८७५ - सिंगमन र्हीम – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१८७४ - रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी

मृत्यू :-

२०१२ - माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी

२००८ - बाबुराव बागूल – दलित साहित्यिक

२००३ - गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या

१९९९ - आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार

१९९७ - नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती

१९९६ - के. के. हेब्बर – चित्रकार

१९९६ - डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक
१८२७ - लुडविग व्हान बीथोव्हेन - कर्णबधिर संगीतकार

समय दर्शक

सभासद व्हा