नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ एप्रिल

घटना :-

२०११ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय

१९९० - स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना

१९८९ - ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन

१९८४ - सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.

१९८२ - फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.

जन्म :-

१९४४ - अजय देवगण – अभिनेता

१९२६ - सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार

१९०२ - बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक

१८७५ - वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक

१८०५ - हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक

१६१८ - फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२००९ - गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार

२००५ - पोप जॉन पॉल (दुसरा)

१९३३ - के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा

१८७२ - सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार

१ एप्रिल

घटना :-
२००४ - ’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली.

१९९० - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्न ’

१९७३ - कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.

१९५७ - भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर, आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.

१९५५ - गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

१९३६ - ओरिसा राज्याची स्थापना झाली.

१९३५ - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.

१९३३ - भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण

१९२८ - पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.

१८८७ - मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१६६९ - उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

जन्म :-

१९४१ - अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज

१९३६ - तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री

१९१२ - पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व

१८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष

१८१५ - ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर

१६२१ - गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू
१५७८ - विल्यम हार्वी –  इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२०१२ - एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी
२००६ - राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार

२००३ - प्रकाश घांग्रेकर – गायक व नट

२००० - संजीवनी मराठे – कवयित्री

१९९९ - श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक

१९८९ - श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार
१९८४ - पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक

समय दर्शक

सभासद व्हा