नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

अध्यापनात संगणकाचा वापर

 

               सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार?

                                                                  संगणकाची वैशिष्ट्ये –

  • १. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.
  • २. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती  मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.
  • ३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.
  • ४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रण, गुणपत्रिका छपाई इत्यादी.
  • ५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.

कृतिसंशोधन

 

संकल्पना-
                शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.

                दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.

समय दर्शक

सभासद व्हा