नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२३ मार्च

घटना :-

१९९९ - पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९ - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९८ - अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्चर नागरी सन्मान जाहीर

१९८० - प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

१९५६ - पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९४० - संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत

१९३१ - सॉन्डर्सचा वध करणार्या् भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.

जन्म :-

१९६८ - माईक अॅसथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू

१९५३ - किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक

१९३१ - व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू

१९२३ - हेमू कलाणी – क्रांतिकारक

१९१६ - हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य

१९१० - डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, व्यासंगी लेखक

१८९८ - नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका

१८८३ - मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक

मृत्यू :-

२०११ - एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री

२००८ - गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार

१९३१ - भगत सिंग – क्रांतिकारक

१९३१ - ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक
१९३१ - शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक

२२ मार्च

घटना :-

१९९९ - लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’

१९७० - हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९४५ - अरब लीगची स्थापना

१९३३ - डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.

१७३९ - नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

जन्म :-

१९२४ - मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार

१७९७ - विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट

मृत्यू :-

२००४ - बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक

१९८४ - प्रभाकर आत्माराम पाध्ये – लेखक व पत्रकार

१८३२ - योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी

समय दर्शक

सभासद व्हा