नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१७ जानेवारी

घटना :-

२००१ - अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.

२००१ - कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर

१९५६ - बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा

१९४६ - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.

१९४५ - दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.

१८७४ - चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा मृत्यू.

जन्म :-

१९४२ - मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा

१९३२ - मधुकर केचे – साहित्यिक

१९१८ - रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

१९१८ - सईद अमीर हैदर कमाल नक्वीट ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी

१९१७ - एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री

१९०८ - अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९०६ - शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका

१९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ

१८९५ - विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी

१७०६ - बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी

मृत्यू  :-

२०१४ - रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री

२०१३ - ज्योत्स्ना् देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या

२०१० - ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री

२००८ - रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर

२००० - सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते

१९९५ - डॉ. व्ही. टी. पाटील – ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक  

१९८८ - लीला मिश्रा – अभिनेत्री

१९७१ - बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ

१९६१ - पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान

१९३० - अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका

१८९३ - रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष

१७७१ - गोपाळराव पटवर्धन – पेशव्यांचे सरदार  
१५५६ - हुमायून – दुसरा मुघल सम्राट

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा