नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

सूर्यनमस्कार

 



सुरुवातीची स्थिती –
                   दोन्ही पाय जुळवून स्थिर उभे राहावे.
कृती -
            १ ते १२ टप्प्यांप्रमाणे (सूर्यनमस्कार) कृती करावी.

Picture
        १
       दोन्ही हातांचे तळवे छातीजवळ नमस्काराप्रमाणे जोडावे.


Picture
             २
       दोन्ही हात सरळ वरुन डोक्याच्या मागे न्यावे. त्याच वेळी कमरेतून शरीर शक्य तितके मागे न्यावे. डोकेही मानेतून मागे न्यावे. नजर वर असावी.


Picture
                      ३
       दोन्ही हात समोरुन खाली आणावे. पाय गुडघ्यांत न वाकवता तळहात पावलांच्या बाजूला जमिनीवर टेकवावे. डोके गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करावा.


Picture
                ४
      आधी उजवा पाया मागे नेऊन चवडा व गुडघा जमिनीला टेकवावा. कोपरं सरळ ठेवून डोके मागे झुकवावे. छाती पुढे काढावी. नजर आकाशाकडे ठेवावी.


Picture
              ५
      नंतर डावा पाय मागे नेऊन उजव्या पायाच्या जवळ ठेवावा. दोन्ही पाय सरळ व हात कोपरांत न वाकवता संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आणावे. नजर जमिनीकडे ठेवावी.


Picture
                  ६
   हात कोपरांत वाकवत
                                              छाती, डोके व गुडघे जमिनीला टेकवावे.

Picture
         ७
       हात कोपरांतून सरळ करत छाती पुढे काढावी. डोके मागे झुकवून नजर आकाशाकडे असावी.


Picture
           ८
       कंबर वर उचलत पायांच्या टाचा जमिनीवर टेकवाव्या. पाय गुडघ्यांत सरळ व हात कोपरांत सरळ
                                                ठेवून शरीर मागे खेचावे.


Picture
             ९
      या स्थितीत उजवा पाय पुढे आणून दोन्ही हातांच्या मधे ठेवावा.डाव्या पायाचा चवडा आणि गुडघा जमिनीवर टेकवावा.


Picture
       १०
      डावा पाय समोर आणून उजव्या पायाशेजारी ठेवावा. गुडघे ताठ ठेऊन कमरेतून वाकावे व कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा.


Picture
                    ११
     दोन्ही हात वर करुन मागे न्यावे. त्याच वेळी कमरेतून शरीर शक्य तितके मागे न्यावे. डोकेही मागे न्यावे व नजर वर असावी.


Picture
                        १२      दोन्ही हात छातीजवळ नमस्काराप्रमाणे जोडलेले असावे.


                      सूर्य हा सर्व प्रणिमात्रांचा जीवनदाता असून तो ऊर्जेचा अखंड स्रोत आहे, म्हणून सूर्य व त्याची उपासना ही एक मूलभूत व प्रभावी उपासना मानली जाते. ह्या उपासनेमुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होण्यास मदत होते.
                     वैदिक काळापासून सूर्यनमस्कार हा एक भारतीय, प्रचीन व सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण असा व्यायाम आहे. रोगप्रतिबंध व रोगोपचार यांसाठी सूर्यनमस्काराचा व्यायाम सांगितला जातो. सूर्यनमस्कार घालणा-याला सर्व प्रकारचे सामर्थ्य प्राप्त होते. नियमित सूर्यनमस्कार घालण्याने शरीर, मन व भावना यांमध्ये समतोल राखला जातो, म्हणून बालपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावणे उचित ठरते. सूर्यनमस्कार घालताना शरीर व मनावर कोणत्याही प्रकारचे ताण-तणाव असू नयेत. प्रत्येक स्थितीत सहभागी स्नायूंना ताण मिळेल असे संथलयीत सूर्यनमस्कार घालावे. घरच्या घरी छोट्याशा जागेत, थोड्या वेळात सूर्यनमस्कार घालता येतात. कोणत्याही ऋतूत कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुष सूर्यनमस्कार घालू शकतात. त्यासाठी साधन-सामग्री व उपकरणे लागत नाहीत. तसेच खास आहार-विहार व विश्रांतीची बंधने नाहीत.


   फायदे
  • १. शरीराचा लवचिकपणा वाढतो.
  • २. स्नायू व सांध्यांना सुखद व्यायाम मिळतो व त्यांची शक्ती हळूहळू वाढते.
  • ३. शरीरांतर्गत सर्व संस्थांवर याचा चांगला परिणाम होतो.
  • ४. प्रदीर्घ आयुरारोग्य, अदम्य कार्यशक्ती, अमाप उत्साह, आत्मविश्वास, तेज, ओज, लवचिकता, टपळाई असे शारीरिक व मानसिक फायदे मिळतात.
  • ५. जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक बनतो.
  • ६. मालसिक संतुलन प्राप्त होण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा