नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१ फेब्रुवारी


घटना-

२००४ - मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.

१९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.

१९८१ - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.

१९७९ - १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.

१९६६ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.

१९६४ - प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५६ - सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४६ - नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.

१९४१ - डॉ. के. बी. लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.

१८९३ - थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.

१८८४ - ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

१८३५ - मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत

१६८९ - गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.

जन्म-

१९७१ - अजय जडेजा – क्रिकेटपटू

१९६० - जॅकी श्रॉफ – अभिनेता

१९३१ - बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष

१९२९ - जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक

१९१७ - ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक

१९१२ - राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, गायक, कवी आणि गीतकार

१९०१ - क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता

१८८४ - ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार

१८६४ - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ

मृत्यू-

२०१२ - अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक 

२००३ - कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर

१९९५ - मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार
१९७६ - वेर्नर हायसेनबर्ग –  जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा