नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१२ मार्च

घटना :-

२००१ - राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला.

१९९९ - सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

१९९९ - चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.

१९९३ - मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी.

१९९२ - स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.

१९९१ - जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी

१९६८ - मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला.

१९३० - ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.

१९१८ - रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.

१९१२ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.

जन्म :-

१९१३ - यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

१९११ - दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री

१८९१ - ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते

१८२४ - गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२००१ - रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक

१९९९ - यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक
१९४२ - रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा