नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२९ मार्च

घटना :-

१९८२ - एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

१९७३ - व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९६८ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना

१९३० - ’प्रभात’चा ’खूनी खंजिर’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१८५७ - बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.

१८४९ - ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

जन्म :-

१९४८ - नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

१९४३ - जॉन मेजर – इंग्लंडचे पंतप्रधान

१९३० - अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान

१९२९ - उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार

१९२६ - पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक

१८६९ - सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार

मृत्यू :-

१९९७ - पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या

१९७१ - धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी

१९६४ - शंकर नारायण तथा ’वत्स’ जोशी – इतिहाससंशोधक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा