नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० एप्रिल

घटना :-

२०१३ - राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले:

पद्मभूषण – कविवर्य मंगेश पाडगावकर, उद्योजक आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खाँ, शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई, विनोदी कलाकार जसपाल भट्टी (मरणोत्तर), अभिनेते राजेश खन्ना (मरणोत्तर)

पद्मश्री – नाना पाटेकर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, डिझायनर रितू कुमार, ऑलिम्पीक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि विजयकुमार

१९४६ - राष्ट्रसंघ (League of Nations) ही संस्था विसर्जित करण्यात आली. पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रुपांतर झाले.

१९४५ - दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

१९३९ - अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा करण्यात आला.

१७७० - प्रसिद्ध दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

जन्म :-

१९५० - चंद्राबाबू नायडू – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

१९३९ - सईदुद्दीन डागर – ध्रुपद गायक

१९१४ - गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक

१८९६ - ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते

१८८९ - अॅ८डॉल्फ हिटलर – नाझी हुकुमशहा

मृत्यू :-

१९७० - शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर

१९६० - अमल ज्योती तथा ’पन्नाीलाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार

१९३८ - ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक
१९१८ - कार्ल ब्राऊन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा