नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२९ नोव्हेंबर

घटना :-

२००० - शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कूव विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर

२००० - दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर

१९९६ - नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्चक नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर

१९६३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.

१९४५ - युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

जन्म :-

१९७७ - युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९३२ - जाक्स शिराक – फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती

१९२६ - प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते

१९०७ - गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक

१८६९ - अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक

मृत्यू :-

२००१ - जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक

१९९३ - जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्नज, उद्योगपती व वैमानिक

१९५९ - ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार

१९३९ - माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते

१९२६ - कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा