नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ नोव्हेंबर

घटना :-

२००८ - बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

२००० - हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना ’आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ जाहीर

१९९६ - कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’नाट्यगौरव पुरस्कार’ डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

१९४८ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९२२ - तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश

१९२१ - जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या

१९१८ - पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली

जन्म :-

१९७१ - तब्बू – अभिनेत्री

१९३४ - विजया मेहता – दिग्दर्शिका

१९२९ - शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला

१९२९ - जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार

१९२५ - ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक

१८९४ - सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी

१८८४ - जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते

१८७१ - शरदचंद्र रॉय – मानववंशशास्त्रज्ञ

१८४५ - वासुदेव बळवंत फडके – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी

१६१८ - औरंगजेब – सहावा मुघल सम्राट

मृत्यू :-

२०११ - दिलीप परदेशी – नाटककार व साहित्यिक 

२००५ - सदाशिव मार्तंड गर्गे – समाजविज्ञान कोशकार 

१९९९ - माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९९५ - यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान

१९९१ - पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक
 
१९७० - पं. शंभू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा