नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

६ डिसेंबर

घटना :-

२००० - थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

१९९९ - जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

१९९२ - अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.

१९८१ - डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.

१९७८ - स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

१९७१ - भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

१९१७ - फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.

१८७७ - द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.



जन्म :-

१९३२ - कमलेश्वर – हिन्दी लेखक, पटकथालेखक

१९२३ - वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार

१९१६ - ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार

१८६१ - रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक

१८५३ - हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार

१८२३ - मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत

१७३२ - वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल

१४२१ - हेन्री (सहावा) – इंग्लंडचा राजा

मृत्यू :-

२०१३ - नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष

१९७६ - क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक

१९७१ - कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
१९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा