नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ जून

घटना:

२००० - लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर

१९९९ - भूतानमधे दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले.

१९७९ - पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९५३ - इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.

१९४९ - दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१८९७ - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूर्यॉक टाईम्सला सांगितले - "माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे".

१८९६ - गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ’रेडिओ’चे पेटंट घेतले.


जन्म :

१९७४ - गाटा काम्स्की – अमेरिकन बुद्धीबळपटू

१९६५ - मार्क वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६५ - स्टीव्ह वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६३ - आनंद अभ्यंकर – अभिनेते

१९५६ - मणीरत्न्म – चित्रपट दिग्दर्शक

१९५५ - नंदन नीलेकणी – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक

१९४३ - इलियाराजा – गीतकार आणि संगीतकार

१८४० - थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी

१७३१ - मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेची पहिली ’फर्स्ट लेडी’


मृत्यू :

१९९२ - डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक

१९९० - सर रेक्स हॅरिसन – हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते

१९८८ - राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक .

१९७५ - देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक

१८८२ - जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता 

१ जून

घटना:

२००४ - रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००३ - चीनमधील महाप्रचंड अशा ’थ्री गॉर्जेस’ धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

२००१ - नेपाळचे राजे वीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेन्द्र यांनी निर्घृण हत्या केली.

१९९६ - भारताचे ११ वे पंतप्रधान म्हणून एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.

१९६१ - अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.

१९५९ - द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

१९४५ - ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना झाली.

१९३० - मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

१९२९ - विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने ’प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

१८३१ - सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर धृवाचे स्थान निश्चित केले.

१७९६ - टेनेसी अमेरिकेचे १६ वे राज्य बनले.

१७९२ - केंटुकी अमेरिकेचे १५ वे राज्य बनले.


जन्म :

१९७० - आर. माधवन – अभिनेता

१९६५ - नायगेल शॉर्ट – इंग्लिश बुद्धिबळपटू

१९३० - बाबा आढाव – सामाजिक कार्यकर्ते

१९६६ - लीला गांधी – नर्तिका व अभिनेत्री

१९२९ - फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ दत्त – हिन्दी चित्रपट अभिनेत्री

१९२६ - नॉर्मा जीन बेकर ऊर्फ मेरिलीन मन्रोअ – अमेरिकन अभिनेत्री

१८७२ - नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – कवी.

१८४२ - सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)


मृत्यू :

२००६ - माधव गडकरी – पत्रकार

२००२ - हॅन्सी क्रोनिए - दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान.

२००१ - नेपाळचे राजे वीरेन्द्र

२००० - मधुकर महादेव टिल्लू – एकपात्री कलाकार

१९९८ - गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार

१९९६ - नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती

१९८७ - ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार

१९८४ - नाना पळशीकर – अभिनेते

१९६८ - हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका

१९४४ - महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट.

१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक

१८६८ - जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष 

समय दर्शक

सभासद व्हा