नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३१ जानेवारी

घटना :-

१९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.

१९५० - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

१९४९ - बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.

१९४५ - युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. दुसर-या महायुद्धाच्या काळात युद्धातुन पळून गेलेल्या एकूण ४९ सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र फक्त स्लोव्हिकच्याच शिक्षेची अंमलबजावणी झाली.

१९२९ - सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.

१९२० - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकया पाक्षिकावी सुरूवात

१९११ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्यार जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

जन्म :-

१९७५ - प्रीती झिंटा चित्रपट अभिनेत्री

१९३१ - गंगाधर महांबरे गीतकार कवी व लेखक

१८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी

मृत्यू  :-

२००४ - व्ही. जी. जोग व्हायोलिनवादक

३० जानेवारी

घटना :-

१९९९ - पण्डित रविशंकर यांना भारतरत्नआ

१९९७ - महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

१९९४ - पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

१९४८ - नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मागांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.

१९३३ - अॅ३डॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.

१६४९ - इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.

जन्म :-

१९४९ - डॉ. सतीश आळेकर नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते

१९२९ - रमेश देव हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक

१९२७ - ओलोफ पाल्मे स्वीडनचे २६ वे पंतप्रधान

१९१७ - वामन दत्तात्रय पटवर्धन स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ

१९११ - पं. गजाननबुवा जोशी शास्त्रीय गायक

१९१० - सी. सुब्रम्हण्यम गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल

१८८२ - फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष

 

मृत्यू  :-

२००४ - रमेश अणावकर गीतकार  

२००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते  

१९९६ - गोविंदराव पटवर्धन हार्मोनियम व ऑर्गन वादक  

१९५१ - फर्डिनांड पोर्श ऑस्ट्रियन वाहन अभियंता

१९४८ - महात्मा गांधी
१९४८ - ऑर्व्हिल राईट इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते

२९ जानेवारी

घटना :-

१९८९ - हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

१९७५ - इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ती फुलराणीया नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

१८८६ - कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्याल मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

१८६१ - कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

१७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅयडव्हर्टायझरया नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. हिकीज बेंगॉल गॅझेटया नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.

 

जन्म :-

१९७० - राज्यवर्धनसिंग राठोड ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज

१९५१ - अँडी रॉबर्टस वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज

१९२६ - डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम

१९२२ - प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक

१८६६ - रोमें रोलाँ फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक

१८६० - अंतॉन चेकॉव्ह रशियन कथाकार व नाटककार

१८४३ - विल्यम मॅक किनले अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष

१७३७ - थॉमस पेन अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक

१२७४ - संत निवृत्तीनाथ

 

मृत्यू  :-

२००१ - राम मेघे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री  

२००० - देवेन्द्र मुर्डेश्वर बासरीवादक  

२००० - पांडुरंग सावळाराम तथा काका वडके शिवसेना नेते  

१९९५ - रुपेश कुमार रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक  

१९९३ - रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय गणितज्ञ  

१९६३ - सदाशिव आत्माराम जोगळेकर लेखक व संपादक

१९६३ - रॉबर्ट फ्रॉस्ट अमेरिकन कवी

१९३४ - फ्रिटझ हेबर जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

१८२० - जॉर्ज (तिसरा)  इंग्लंडचा राजा
१५९७ - महाराणा प्रताप  मेवाडचा सम्राट

२८ जानेवारी

घटना :-

२०१० - १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

१९७७ - मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८६ - चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.

१९६१ - एच. एम. टी. वॉच फॅक्टरीहा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

१९४२ - दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

१६४६ - मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध

जन्म :-

१९५५ - निकोलस सारकोझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

१९३७ - सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर चित्रपट व भावगीत गायिका

१९३० - पं. जसराज मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक

१९२५ - डॉ. राजा रामण्णा शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष

१८९९ - फील्डमार्शल के. एम. करिअप्पा स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख

१८६५ - पंजाब केसरीलाला लजपतराय स्वातंत्र्यसेनानी

१४५७ - हेन्रीज (सातवा) इंग्लंडचा राजा

 

मृत्यू  :-

२००७ - ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर संगीतकार

१९९७ - डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ

१९९६ - बर्न होगार्थ अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ

१९८४ - सोहराब मेहेरबानजी मोदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते

१८५१ - बाजीराव पेशवे (दुसरे)
१६१६ - संत दासोपंत समाधिस्थ

२७ जानेवारी

घटना :-

१९७३ - पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्धसंपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.

१९६७ - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना

१९४४ - दुसरे महायुद्ध ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.

१८८८ - वॉशिंग्टन डी. सी. येथे 'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'ची स्थापना

जन्म :-

१९६७ - बॉबी देओल हिन्दी चित्रपट कलाकार

१९२६ - जनरल अरुणकुमार वैद्य भारताचे १३ वे लष्करप्रमुख

१९२२ - अजित खान ऊर्फ अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक

१९०१ - लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गा्ते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक

१८५० - एडवर्ड जे. स्मिथ आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान

१७५६ - वूल्फगँग मोझार्ट ऑस्ट्रियन संगीतकार

 

मृत्यू  :-

२००९ - आर. वेंकटरमण भारताचे ८ वे राष्ट्रपती, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी

२००८ - सुहार्तो इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष

२००७ - कमलेश्वर हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक

१९८६ - निखिल बॅनर्जी मैहर घराण्याचे सतारवादक

१९६८ - सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक
१९४७ - पॉल हॅरिस रोटरी क्लबचे संस्थापक

२६ जानेवारी - भारतीय प्रजासत्ताक दिन

घटना :-

२००१ - गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.

१९९८ - कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषणपुरस्कार प्रदान

१९७८ - महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू

१९५० - भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.

१९५० - एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४२ - दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन

१९३३ - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली. स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड झाली. पुढे प्रत्यक्षात १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक राज्यपध्दती स्वीकारली जाऊन तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होऊ लागला.

१९२४ - रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.

१८७६ - मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.

१८३७ - मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.

१६६२ - लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया

१५६५ - विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

जन्म :-

१९५७ - शिवलाल यादव क्रिकेटपटू

१९२५ - पॉल न्यूमन अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर

१९२१ - अकिओ मोरिटा सोनी कार्पोरेशनचे संस्थापक

१८९१ - चंद्रशेखरशिवराम गोर्हेश बडोद्याचे राजकवी

मृत्यू  :-

१९६८ - लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे

१९५४ - मानवेंद्रनाथ रॉय देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक

१८२३ - एडवर्ड जेन्न र देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर
१७३० - कवी श्रीधर

समय दर्शक

सभासद व्हा