नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० सप्टेंबर

घटना :-

२००० - देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे हॉल ऑफ फेमहा विशेष पुरस्कार जाहीर

१९९८ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना 'शांतिस्वरुप भटनागर' पुरस्कार जाहीर

१९९४ - गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते दादासाहेबफाळके पुरस्कारप्रदान

१९९३ - लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.

१९६१ - दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्न०ई) येथे खेळला गेला.

१९४७ - पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९३५ - हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

१८९५ - फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

१३९९ - हेन्रीस (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

जन्म :-

१९८० - मार्टिना हिंगीस स्विस लॉनटेनिस खेळाडू

१९७२ - शंतनु मुकर्जी ऊर्फ शान’ – पार्श्वगायक

१९३३ - प्रभाकर पंडित संगीतकार व व्हायोलिनवादक

१९६१ - चंद्रकांत पंडित क्रिकेटपटू

१९२२ - हृषिकेश मुकर्जी चित्रपट दिग्दर्शक

१९०० - एम. सी. छागला न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री

मृत्यू  :-

२००१ - केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन

१९९८ - चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदानचळवळीतील कार्यकर्त्या

१९९२ - गंगाधर देवराव खानोलकर लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्म य सेवकया कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.

१९८५ - चार्लस रिच्टर अमेरिकन भूवैज्ञानिक
१६९४ - मार्सेलिओ माल्पिघी इटालियन डॉक्टर

२९ सप्टेंबर

घटना :-

२०१२ - अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००८ - लेहमन ब्रदर्सआणि वॉशिंग्टन म्युच्युअलया बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा डाऊ जोन्सनिर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.

१९९१ - हैतीमधे लष्करी उठाव

१९६३ - बिर्ला तारांगणहे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.

१९४१ - दुसरे महायुद्ध किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

१९१७ - मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची (IES) पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कुलसुरू झाली.

१९१६ - जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.

जन्म :-

१९७८ - मोहिनी भारद्वाज अमेरिकन कसरतपटू (Gymnast)

१९५७ - ख्रिस ब्रॉड इंग्लिश क्रिकेटपटू व पंच

१९४३ - लेक वॉलेसा नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष

१९३४ - लान्स गिब्ज वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज

१९३२ - हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू

१९३२ - महमूद विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता

१९२८ - ब्रजेश मिश्रा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

१९२५ - डॉ. शरदचंद्र गोखले समाजसेवक

१९०१ - एनरिको फर्मी न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ

१८९० - ल. गो. तथा नानाशास्त्री दाते पंचांगकर्ते 

मृत्यू  :-

१९९१ - उस्ताद युनुस हुसेन खाँ आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक

१९१३ - रुडॉल्फ डिझेल डिझेल इंजिनचा संशोधक

१८३३ - फर्डिनांड (सातवा) स्पेनचा राजा
  ८५५ - लोथार (पहिला) रोमन सम्राट

२८ सप्टेंबर

घटना :-

२००० - विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना विष्णूदास भावे गौरव पुरस्कारजाहीर

१९९९ - महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर

१९६० - माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९५० - इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९३९ - दुसरे महायुद्ध वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९२८ - सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे पेनिसिलीनया प्रतिजैविकाचा शोध लागला.

जन्म :-

१९८२ - अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय

१९८२ - रणबीर कपूर अभिनेता

१९४७ - शेख हसीना बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान

१९४६ - माजिद खान पाकिस्तानी क्रिकेट कप्तान

१९२९ - लता मंगेशकर सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्न , दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण

१९०९ - पी. जयराज मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते

१९०७ - भगत सिंग क्रांतिकारक

१८९८ - शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महसभेचे अध्यक्ष, देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला

१८०३ - प्रॉस्पर मेरिमी फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ

मृत्यू  :-

२०१२ - ब्रजेश मिश्रा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

२०१२ - माधव एस. शिंदे प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)

२००४ - डॉ. मुल्कराज आनंद लेखक

२००० - श्रीधरपंत दाते सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते

१९९२ - मेजर ग. स. ठोसर पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे

१९८९ - फर्डिनांड मार्कोस फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष

१९५६ - विल्यम बोईंग बोईंग विमान कंपनीचे संस्थापक

१९५३ - एडविन हबल अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
१८९५ - लुई पाश्चर फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

२७ सप्टेंबर

घटना :-

१९९६ - तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हा नुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.

१९६१ - सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५८ - मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.

१९४० - दुसरे महायुद्ध बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.

१९२५ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

१८२१ - मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

जन्म :-

१९८१ - लक्ष्मीपती बालाजी क्रिकेटपटू

१९८१ - ब्रॅन्डन मॅककलम न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९६२ - गेव्हिन लार्सन न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९५३ - माता अमृतानंदमयी

१९३२ - यश चोप्रा चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते

१९०७ - वामनराव देशपांडे संगीत समीक्षक

१६०१ - लुई (तेरावा) फ्रान्सचा राजा



मृत्यू  :-

२००८ - महेन्द्र कपूर पार्श्वगायक

२००४ - शोभा गुर्टू शास्त्रीय गायिका

१९९९ -  डॉ. मेबल आरोळे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका

१९९२ - अनुताई वाघ समाजसेविका

१९७५ - तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री रसायनशास्त्रज्ञ

१९७२ - एस. आर. रंगनाथन भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ

१९२९ - शिवराम महादेव परांजपे – ’काळकर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
१८३३ - राजा राम मोहन रॉय समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.

२६ सप्टेंबर

घटना :-

१९९० - रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८४ - युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

१९७३ - ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्यास काँकॉर्डया विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

१९६० - फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

१९५० - इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

जन्म :-

१९८१ - सेरेना विल्यम्स अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९४३ - इयान चॅपेल ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कप्तान

१९३२ - डॉ. मनमोहन सिंग भारताचे १३ वे पंतप्रधान, अर्थतज्ञ?

१९३१ - विजय मांजरेकर क्रिकेटपटू

१९२३ - देव आनंद चित्रपट अभिनेता व निर्माता

१८९४ - आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक

१८८८ - टी. एस. इलियट अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते

१८५८ - मणिलाल नथुभाई त्रिवेदी गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते

१८४९ - इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ

१८२० - इश्वरचन्द्र विद्यासागर बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नां्मुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला.

मृत्यू  :-

२००८ - पॉल न्यूमन अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर

२००२ - राम फाटक गायक व संगीतकार

१९९६ - विद्याधर गोखले नाटककार व संपादक

१९८९ - हेमंतकुमार गायक, संगीतकार आणि निर्माता

१९८८ - पण्डित शिवरामबुवा दिवेकर हिन्दगंधर्व

१९७७ - उदय शंकर जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे इंडिया कल्चरल सेंटरची स्थापना केली.

१९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक
१९०२ - लेव्ही स्ट्रॉस अमेरिकन उद्योजक

समय दर्शक

सभासद व्हा