नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ जून

घटना:

२००६ - नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.

१९९९ - विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.

१९९८ - फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.

१९९५ - पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

१९९२ - विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्या’ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर

१९९१ - भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.

१९६१ - अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खा-या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.

१९४९ - राजस्थान उच्चस न्यायालयाची स्थापना

१९४८ - पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे

१८९८ - अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.

१७८८ - न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.


जन्म :

१९५३ - बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान

१९५२ - जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९२३ - सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक

१९१६ - सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख

१९०५ - जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते



मृत्यू :

२०१२ - भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार

२००३ - लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार

१९७० - सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१९४० - डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष

१९२८ - द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार

२० जून

घटना:

२००१ - परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.

१९९७ - ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

१९६० - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना

१९२१ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना

१८९९ - केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

१८८७ - देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

१८६३ - वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.

१८३७ - व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी


जन्म :

१९७२ - पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू

१९५४ - अॅ५लन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू

१९३९ - रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष

१९२० - मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते

१९१५ - टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार

१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक



मृत्यू :

२००८ - चंद्रकांत गोखले – अभिनेते

१९९७ - वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर

१९९७ - बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक

१८३७ - विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा 

१९ जून

घटना:

१९९९ - ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्घााटन केले.

१९८९ - इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७७ - ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

१९६६ - ’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

१९६१ - कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९१२ - अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

१८६२ - अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.

१६७६ - शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.


जन्म :

१९७० - राहूल गांधी – काँग्रेसचे सरचिटणीस

१९४७ - सलमान रश्दी – वादग्रस्त व बहुचर्चित लेखक

१९४५ - आंग सान स्यू की – नोबेल पारितोषिकविजेत्या ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी नेत्या

१८७७ - डॉ. पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ 

१६२३ - ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ



मृत्यू :

२००० - माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील व चित्रपट अभिनेत्री.

१९९८ - रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक

१९९६ - कमलाबाई पाध्ये – समाजसेविका 

१९९३ - विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक

१९५६ - थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष

१७४७ - नादिर शहा – पर्शियाचा सम्राट

१८ जून

घटना:

१९८१ - जनावरांमधे आढळणार्या: लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.

१९५६ - रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.

१९४६ - डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ’१८ जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.

१९०८ - फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

१९३० - चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.

१८३० - फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.

१८१५ - वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव


जन्म :

१९६५ - उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा

१९४२ - थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष

१९४२ - पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक

१९३१ - के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक

१९११ - कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ

१८९९ - शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक



मृत्यू :

२००९ - उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक

२००३ - जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते

१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार 

१९७४ - सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक

१९६२ - जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य, नामवंत विद्वान 

१९५८ - डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू

१९३६ - मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक

१९०२ - सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक

१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर – लेखक

१८५८ - मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी

१७ जून

घटना:

१९९१ - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ’भारतरत्न.’ हा सर्वोच्चख नागरी सन्मान जाहीर

१९६७ - चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

१९६३ - अमेरिकेच्या सर्वोच्चो न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

१९४४ - आइसलँडने (डेन्मार्कपासुन) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९४० - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.


जन्म :

१९८१ - शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९७३ - लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू

१९०३ - बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक

१२३९ - एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा



मृत्यू :

१९९६ - मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक

१९८३ - शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक 

१९६५ - मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – अभिनेते

१९२८ - पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक

१८९५ - गोपाळ गणेश आगरकर – समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ

१६७४ - राजमाता जिजाबाई

१२९७ - संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली 

१६ जून

घटना :

१९९० - मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्चां क गाठला गेला.

१९६३ - व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.

१९४७ - नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव‘ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

१९१४ - सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका

१९११ - एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.

१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना



जन्म :

१९९४ - आर्या आंबेकर – गायिका

१९६८ - अरविंद केजरीवाल – ’आम आदमी पार्टी’चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी

१९३६ - अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी

१९२० - हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता

१७२३ - अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता



मृत्यू :

१९९५ - शुद्धमती तथा ’माई’ मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री

१९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट

१९४४ - आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते.

१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार.

१५ जून

घटना:

२००८ - ’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.

२००१ - ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.

१९९७ - अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी होऊन आरोप चुकवत असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्चल न्यायालयाने दिला.

१९९४ - इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९९३ - संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त

१९७० - बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

१९१९ - कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.

१८६९ - महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.

१८४४ - चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.

१६६७ - वैद्यकीय इतिहासात प्रथम रक्तदान करण्यात आले. जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असले रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झाले.


जन्म :
                                               
१९४७ - प्रेमानंद गज्वी – साहित्यिक व नाटककार

१९३७ - किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – समाजसेवक

१९३३ - सरोजिनी वैद्य – लेखिका

१९३२ - झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक

१९२९ - सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री

१९२८ - शंकर वैद्य – साहित्यिक

१९२३ - केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – साहित्यिक

१९१७ - सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक

१९०७ - ना. ग. गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत

१८९८ - गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक                                     

मृत्यू :

१९८३ - श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – तेलगु कवी व गीतकार

१९७९ - सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार

१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक

१५३४ - योगी चैतन्य महाप्रभू

१४ जून

घटना:

२००१ - ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्याल उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.

१९७२ - डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

१९६७ - चीनने पहिल्या ’हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.

१९४५ - भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर

१९४० - जर्मनीने पॅरिस ताब्यात घेतल्यामुळे दोस्त राष्ट्रांनी तिथुन माघार घेतली.

१८९६ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ’अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली. यातुनच पुढे कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम सुरू झाले.

१७८९ - मक्यापासुन पहिल्यांदाच ’व्हिस्की’ तयार करण्यात आली. तिला ’बोर्बोन’ असे नाव देण्यात आले कारण तयार करणारा रेव्हरंड क्रेग हा केंटुकी प्रांतातील ’बोर्बोन’ येथील रहिवासी होता.

१७७७ - अमेरिकेने ’स्टार्स अँड स्ट्राइप्स’ या ध्वजाचा स्वीकार केला.

१७०४ - मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.



जन्म :

१९६९ - स्टेफी ग्राफ – जर्मन लॉन टेनिस खेळाडू

१९२२ - के. असिफ – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक  

१८६८ - कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ

१८६४ - अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ 

१७३६ - चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ



मृत्यू :

२०१० - मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक

२००७ - कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस

१९८९ - सुहासिनी मुळगांवकर – अभिनेत्री व संस्कृत पंडित. 

१९४६ - जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक

१९२० - मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ

१९१६ - गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार.

१८२५ - पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता

१३ जून

घटना:

२००० - स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.

१९९७ - दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्यूमुखी पडले तर सुमारे १०० जण जखमी झाले.

१९८३ - पायोनिअर-१० हे मानवविरहित अंतराळयान नेपच्यूनची कक्षा ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे पहिले यान ठरले.

१९७८ - इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.

१९५६ - पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.

१९३४ - अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली.


जन्म :

१९२३ - प्रेम धवन – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ’ए मेरे प्यारे वतन’ फेम

१९०९ - इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते

१९०५ - कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते.

१८७९ - गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक

१८३१ - जेम्स क्लार्क मॅक्सवेल – ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ

१८२२ - कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ



मृत्यू :

२०१२ - ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक

१९६९ - प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते

१९६७ - विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार

१२ जून

घटना:

२००१ - कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील 'वूमन ग्रॅंडमास्टर' बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

१९९६ - एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.

१९९३ - पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी

१९७५ - अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली.

१९६४ - वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

१९४४ - दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

१९४० - दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

१९१३ - जॉन ब्रे या अमेरिकन माणसाने जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली.

१९०५ - नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

१८९८ - फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.


जन्म :

१९५७ - जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक

१९२९ - अॅन फ्रँक – जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी

१९१७ - भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार

१८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक.

 ०४९९ - आर्यभट्ट – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ


मृत्यू :

२००३ - ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता

२००० - पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’ – लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते

१९८३ - नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री

१९८१ - प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश

१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ

११ जून

घटना:

२००७ - बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.

१९७२ - दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.

१९७० - अॅ७ना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

१९३७ - जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्यांॉना ठार केले.

१९०१ - न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

१८६६ - अलाहाबाद उच्चू न्यायालयाची स्थापना

१६६५ - मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.


जन्म :

१९४७ - लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री

१८९७ - राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक

१८९४ - काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक



मृत्यू :

 
१९९७ - मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय

१९८३ - घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती

१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक.

१९२४ - वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी

१७२७ - जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा.

१० जून

घटना:

१९९९ - उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ’नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’ साठी निवड

१९७७ - अॅ७पल कॉम्प्युटर्सने आपला ’अॅ्पल-II’ हा संगणक विकण्यास सुरूवात केली.

१९४० - दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४० - दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९३५ - अॅ३क्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ व बिल विल्सन यांनी ’अल्कोहोलिक्स अॅकनॉनिमस’ या संस्थेची स्थापना केली.

१७६८ - माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.


जन्म :

१९५५ - प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला बॅडमिंटनपटू

१९३८ - राहूल बजाज – उद्योगपती व राज्यसभा खासदार

१९२४ - के. भालचंद्र – नेत्रशल्यविशारद

१९०८ - जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण

१९०६ - गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१).

१२१३ - फख्रुद्दीन ’इराकी’ – पर्शियन तत्त्वज्ञ


मृत्यू :

२००१ - फुलवंताबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या. 

१८३६ - आंद्रे अॅईम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ

९ जून

घटना:

२००६ - १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.

२००१ - भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

१९७५ - ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

१९७४ - सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

१९६४ - भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.

१९४६ - राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

१९३१ - रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञालाअंतराळ प्रक्शःएपणासाठी वापरल्या जाणार्यात रॉकेटचे पेटंट मिळाले.

१९२३ - बल्गेरियात लष्करी उठाव झाला.

१९०६ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण

१७०० - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

१६९६ - छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्नक झाले. मुलाचे नाव ’शिवाजी’ असे ठेवले.


जन्म :

१९८५ - सोनम कपूर – अभिनेत्री

१९७७ - अमिशा पटेल – अभिनेत्री

१९४९ - किरण बेदी – सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी

१९१२ - वसंत देसाई – संगीतकार

१६७२ - पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार



मृत्यू :

२०११ - मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक

१९९५ - प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी

१९९३ - सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक.

१९८८ - गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ ’विवेक’ – अभिनेते 

१९४६ - आनंद महिडोल तथा राम (सातवा) – थायलँडचा राजा

१९०० - बिरसा मुंडा - आदिवासी स्वातंत्र्यसैनिक

१८७० - चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक

१८३४ - पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक

१७१६ - बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती

८ जून

घटना:

२००४ - आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.

१९६९ - लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश मुक्त केला. त्यानंतर त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्चम लष्करी पद देण्यात आले.

१९५३ - कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.

१९४९ - जॉर्ज ऑर्वेलची ’१९८४’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली

१९४८ - ’एअर इंडिया’ची मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.

१९४१ - दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.

१९१८ - नोव्हा अॅयक्विमला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध

१९१५ - लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ’गीतारहस्य’ या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.

१९१२ - कार्ल लेम्ले यांनी ’यूनिव्हर्सल पिक्चर्स’ या कंपनीची स्थापना केली.

१७१३ - मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.

१७०७ - औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.

१६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.


जन्म :

१९५७ - डिंपल कपाडिया – अभिनेत्री

१९३२ - रे इलिंगवर्थ – इंग्लिश क्रिकेटपटू

१९२१ - सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष

१९१७ - गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार

१९१० - दिनकर केशव तथा ’दि. के.’ बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक



मृत्यू :

१९९५ - राम नगरकर – विनोदी नट. 

१८४५ - अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष

१८०९ - थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक

१७९५ - लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा

  ६३२ - मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक 

७ जून

घटना:

२००६ - अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

२००४ - शिरोमणी अकाली दल (लोंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

२००१ - युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेअरच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत

१९९४ - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती. या पदावर प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

१९७९ - रशियातील कापुस्तिन यार येथुन ’भास्कर-१’ या दुसर्याज भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

१९७५ - क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमधे सुरूवात झाली.

१९६५ - अमेरिकेच्या सर्वोच्चव न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

१८९३ - महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.


जन्म :

१९८१ - अॅना कुर्निकोव्हा – रशियन लॉन टेनिस खेळाडू

१९७४ - महेश भूपती – भारतीय लॉन टेनिस खेळाडू

१९४२ - मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा

१९१७ - डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते

१९१४ - ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार

१९१३ - मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार

१८३७ - अॅलॉइस हिटलर – अॅयडॉल्फ हिटलरचे वडील



मृत्यू :

२००२ - बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री.

२००० - गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ’आनंद’ मासिकाचे संपादक

१९७० - इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक

१९९२ - डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. 

१९५४ - अॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ

६ जून

घटना:

१९९३ - मंगोलियात प्रथमच राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट निवडणूका घेण्यात आल्या.

१९८२ - इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

१९७४ - स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

१९७० - इंग्लंडमधे सी. हेन्केल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

१९६९ - वि. स. पागे समितीने केलेल्या शिफारशीवरुन रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली. १९७२ च्या भीषण दुष्काळात तिचे ’रोजगार हमी योजना’ असे नामकरण करण्यात आले. जानेवारी १९७३ पासून या योजनेतील मजुरांना देण्यात येणारा खाऊ ’सुकडी’ या नावाने प्रसिद्ध झाला.

१९३० - गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना

१८८२ - अरबी समुद्रात आलेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे मुंबईत सुमारे १,००,००० लोक मृत्यूमुखी पडले.

१८३३ - रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१६७४ - रायगड येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक झाला.


जन्म :

१९५६ - बियॉन बोर्ग – स्वीडीश लॉनटेनिस खेळाडू

१९२९ - सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री  

१९१९ - राजेन्द्र कृष्ण – गीतकार कवी व पटकथालेखक

१९०९ - गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार 

१९०१ - सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१८५० - कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ



मृत्यू :

२००२ - शांता शेळके – कवयित्री आणि गीतलेखिका.

१९७६ - जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist)

१९६१ - कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ

१९५७ - रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक

१८९१ - जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान

५ जून

घटना:

१९९४ - वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

१९८० -  भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

१९७७ - सेशेल्समधे उठाव झाला.

१९७५ - सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.

१९५९ - सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.

१९१५ - डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.


जन्म :

१९०८ - रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक

१८८३ - जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ

१८८१ -  गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक.

१८७९ - नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक

१७२३ - अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता


मृत्यू :

२००४ - रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष

१९९९ - राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले 

१९७३ - माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक

१९५० - हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक

४ जून

घटना:

२००१ - राजवाड्यात झालेल्या हत्यासत्रानंतर नेपाळचे राजे ग्यानेंद्र गादीवर बसले.

१९९७ - ’इन्सॅट-२डी’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेन्च गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

१९९४ - गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.

१९९४ - वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ८ डावांत ७ शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.

१९९३ - आय. एन. एस. म्हैसुर या युद्धविनाशकेचे जलावतरण

१९७९ - घानामधे लष्करी उठाव

१९७० - टोंगाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९४४ - दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी रोम जिंकले.

१८९६ - हेन्रीम फोर्डने तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे रस्त्यावर यशस्वी परीक्षण करण्यात आले.

१६७४ - राज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकीलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.



जन्म :

१९७५ - अँजेलिना जोली – अमेरिकन अभिनेत्री

१९४७ - अशोक सराफ – विनोदी अभिनेता

१९४६ - एस. पी. बालसुब्रम्हण्यम – दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक

१९३६ - नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री

१७३८ - जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा



मृत्यू :

१९४७ - पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक

३ जून

घटना:

१९९८ - जमिनीवरील व हवेतील लक्ष्यावर मारा करणार्याठ ’त्रिशूल’ या क्षेपणास्त्राची ’द्रोणाचार्य’ या युद्धनौकेवरुन कोचीजवळ यशस्वी चाचणी

१९८४ - ’ऑपरेशन ब्लू स्टार’ – भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरात लपुन बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.

१९५० - मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी ’अन्नैपूर्णा’ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.

१९४० - दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.

१९१६ - महर्षि कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

१८१८ - मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६६ - वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान व जलदगती गोलंदाज

१९४७ - हिन्दूस्तानच्या फाळणीची ’मांउंटबॅटन योजना’ जाहीर झाली.

१९२४ - एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री

१८९५ - सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्क र – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित

१८९२ - आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका

१८९० - बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी’

१८९० - खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’

१८६५ - जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा



मृत्यू :

२०१० - अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.

१९९७ - रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, 

१९५६ - वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, लेखक व नाटककार.

१९३२ - सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी

१६५७ - विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ 

२ जून

घटना:

२००० - लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर

१९९९ - भूतानमधे दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले.

१९७९ - पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९५३ - इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.

१९४९ - दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१८९७ - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूर्यॉक टाईम्सला सांगितले - "माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे".

१८९६ - गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ’रेडिओ’चे पेटंट घेतले.


जन्म :

१९७४ - गाटा काम्स्की – अमेरिकन बुद्धीबळपटू

१९६५ - मार्क वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६५ - स्टीव्ह वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६३ - आनंद अभ्यंकर – अभिनेते

१९५६ - मणीरत्न्म – चित्रपट दिग्दर्शक

१९५५ - नंदन नीलेकणी – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक

१९४३ - इलियाराजा – गीतकार आणि संगीतकार

१८४० - थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी

१७३१ - मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेची पहिली ’फर्स्ट लेडी’


मृत्यू :

१९९२ - डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक

१९९० - सर रेक्स हॅरिसन – हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते

१९८८ - राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक .

१९७५ - देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक

१८८२ - जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता 

१ जून

घटना:

२००४ - रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००३ - चीनमधील महाप्रचंड अशा ’थ्री गॉर्जेस’ धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

२००१ - नेपाळचे राजे वीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेन्द्र यांनी निर्घृण हत्या केली.

१९९६ - भारताचे ११ वे पंतप्रधान म्हणून एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.

१९६१ - अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.

१९५९ - द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

१९४५ - ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना झाली.

१९३० - मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

१९२९ - विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने ’प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

१८३१ - सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर धृवाचे स्थान निश्चित केले.

१७९६ - टेनेसी अमेरिकेचे १६ वे राज्य बनले.

१७९२ - केंटुकी अमेरिकेचे १५ वे राज्य बनले.


जन्म :

१९७० - आर. माधवन – अभिनेता

१९६५ - नायगेल शॉर्ट – इंग्लिश बुद्धिबळपटू

१९३० - बाबा आढाव – सामाजिक कार्यकर्ते

१९६६ - लीला गांधी – नर्तिका व अभिनेत्री

१९२९ - फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ दत्त – हिन्दी चित्रपट अभिनेत्री

१९२६ - नॉर्मा जीन बेकर ऊर्फ मेरिलीन मन्रोअ – अमेरिकन अभिनेत्री

१८७२ - नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – कवी.

१८४२ - सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)


मृत्यू :

२००६ - माधव गडकरी – पत्रकार

२००२ - हॅन्सी क्रोनिए - दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान.

२००१ - नेपाळचे राजे वीरेन्द्र

२००० - मधुकर महादेव टिल्लू – एकपात्री कलाकार

१९९८ - गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार

१९९६ - नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती

१९८७ - ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार

१९८४ - नाना पळशीकर – अभिनेते

१९६८ - हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका

१९४४ - महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट.

१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक

१८६८ - जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष 

समय दर्शक

सभासद व्हा