नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प

 प्रकल्प म्हणजे काय ?


             विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे –

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.

2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.

3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.

4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.

5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.

शालेय परिपाठ

  1. राष्ट्रगीत                   
  2. प्रतिज्ञा                   
  3. संविधान प्रास्ताविका
  4. प्रार्थना                  
  5. सुविचार व श्लोक     
  6. दिन विशेष           
  7. बातम्या              
  8. समूह गीत           
  9. वैज्ञानिक दृष्टिकोण 
  10. बोधकथा              
  11. पसायदान           
  12. मौन                 
 
              प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परिपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात परिपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही.
             प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी १० विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत व पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.

समय दर्शक

सभासद व्हा