नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२६ जून

घटना:

२००० - पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

१९९९ - पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.

१९९९ - नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

१९७५ - पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.

१९७४ - नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ

१९७४ - ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

१९६८ - पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाकटन झाले.

१९६० - मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६० - सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१७२३ - रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.


जन्म :

१९५१ - गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९१४ - शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान

१८९२ - पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका

१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते

१८७४ - छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक

१८७३ - अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका

१८२४ - लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ

१७३० - चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ



मृत्यू :

२००५ - एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू

२००४ - यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता

२००१ - वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार

१९४३ - कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ

  ३६३ - रोमन सम्राट ज्यूलियनची हत्या 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा