नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० जून

घटना:

१९९७ - ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

१९८६ - केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

१९७८ - अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

१९७१ - सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

१९६६ - कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६५ - भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९६० - काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४४ - मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्का बसला.


जन्म :

१९६९ - सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६६ - माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा

१९४३ - सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९२८ - कल्याणजी वीरजी शाह – ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार जोडीतील ज्येष्ठ बंधू

१४७० - चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा



मृत्यू :

१९९९ - कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – मराठी काव्यसृष्टीतील कवी 

१९९७ - राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक.

१९९४ - बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक

१९९२ - डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक 

१९१७ - दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा