नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

गणित - वर्णनात्मक नोंदी

  1. अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो/ते.
  2. अक्षरी संख्या अंकात मांडतो/ते.
  3. आलेखाचे वाचन करतो/ते.
  4. आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो/ते.
  5. उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो/ते.
  6. उदाहरणे गतीने सोडवितो/ते.
  7. क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो/ते.
  8. गणितातील सूत्रे समजून घेतो/ते.
  9. गणितीय कोडी सोडवितो/ते.
  10. गणितीय चिन्हे ओळखतो/ते.
  11. गुणाकाराने पाढे तयार करतो/ते.
  12. चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो/ते.
  13. तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो/ते.
  14. थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो/ते.
  15. दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो/ते.
  16. दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो/ते.
  17. परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो/ते.
  18. पाढे पाठांतर करतो/ते.
  19. बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो/ते.
  20. भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो/ते.
  21. भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो/ते.
  22. भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो/ते.
  23. लहान मोठ्या संख्या ओळखतो/ते.
  24. विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो/ते.
  25. विविध परिमाणे समजून घेतो/ते.
  26. विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो/ते.
  27. विविध भौमितिक संबोध समजून घेतो/ते.
  28. विविध राशिची एकके सांगतो/ते.
  29. विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो/ते.
  30. संख्या अक्षरी लिहितो/ते.
  31. संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो/ते.
  32. संख्या वाचन करतो/ते
  33. संख्या विस्तारीत रूपात लिहितो/ते.
  34. संख्याचा क्रम ओळखतो/ते.
  35. संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो/ते.
  36. संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो/ते.
  37. संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो/ते.
  38. संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो/ते.
  39. समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो/ते.
  40. सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो/ते
  41. सारणी व तक्ता तयार करतो/ते.
  42. सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो/ते.

3 comments:

समय दर्शक

सभासद व्हा