नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१२ जून

घटना:

२००१ - कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील 'वूमन ग्रॅंडमास्टर' बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

१९९६ - एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.

१९९३ - पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी

१९७५ - अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली.

१९६४ - वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

१९४४ - दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

१९४० - दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

१९१३ - जॉन ब्रे या अमेरिकन माणसाने जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली.

१९०५ - नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

१८९८ - फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.


जन्म :

१९५७ - जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक

१९२९ - अॅन फ्रँक – जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी

१९१७ - भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार

१८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक.

 ०४९९ - आर्यभट्ट – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ


मृत्यू :

२००३ - ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता

२००० - पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’ – लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते

१९८३ - नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री

१९८१ - प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश

१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा