नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

११ जून

घटना:

२००७ - बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.

१९७२ - दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.

१९७० - अॅ७ना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

१९३७ - जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्यांॉना ठार केले.

१९०१ - न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

१८६६ - अलाहाबाद उच्चू न्यायालयाची स्थापना

१६६५ - मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.


जन्म :

१९४७ - लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री

१८९७ - राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक

१८९४ - काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक



मृत्यू :

 
१९९७ - मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय

१९८३ - घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती

१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक.

१९२४ - वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी

१७२७ - जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा