नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ जून

घटना :

१९९० - मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्चां क गाठला गेला.

१९६३ - व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.

१९४७ - नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव‘ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

१९१४ - सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका

१९११ - एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.

१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना



जन्म :

१९९४ - आर्या आंबेकर – गायिका

१९६८ - अरविंद केजरीवाल – ’आम आदमी पार्टी’चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी

१९३६ - अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी

१९२० - हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता

१७२३ - अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता



मृत्यू :

१९९५ - शुद्धमती तथा ’माई’ मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री

१९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट

१९४४ - आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते.

१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा