नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ जून

घटना:

२००६ - नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.

१९९९ - विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.

१९९८ - फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.

१९९५ - पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

१९९२ - विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्या’ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर

१९९१ - भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.

१९६१ - अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खा-या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.

१९४९ - राजस्थान उच्चस न्यायालयाची स्थापना

१९४८ - पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे

१८९८ - अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.

१७८८ - न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.


जन्म :

१९५३ - बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान

१९५२ - जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९२३ - सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक

१९१६ - सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख

१९०५ - जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते



मृत्यू :

२०१२ - भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार

२००३ - लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार

१९७० - सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१९४० - डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष

१९२८ - द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा