नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

६ जून

घटना:

१९९३ - मंगोलियात प्रथमच राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट निवडणूका घेण्यात आल्या.

१९८२ - इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

१९७४ - स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

१९७० - इंग्लंडमधे सी. हेन्केल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

१९६९ - वि. स. पागे समितीने केलेल्या शिफारशीवरुन रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली. १९७२ च्या भीषण दुष्काळात तिचे ’रोजगार हमी योजना’ असे नामकरण करण्यात आले. जानेवारी १९७३ पासून या योजनेतील मजुरांना देण्यात येणारा खाऊ ’सुकडी’ या नावाने प्रसिद्ध झाला.

१९३० - गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना

१८८२ - अरबी समुद्रात आलेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे मुंबईत सुमारे १,००,००० लोक मृत्यूमुखी पडले.

१८३३ - रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१६७४ - रायगड येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक झाला.


जन्म :

१९५६ - बियॉन बोर्ग – स्वीडीश लॉनटेनिस खेळाडू

१९२९ - सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री  

१९१९ - राजेन्द्र कृष्ण – गीतकार कवी व पटकथालेखक

१९०९ - गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार 

१९०१ - सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१८५० - कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ



मृत्यू :

२००२ - शांता शेळके – कवयित्री आणि गीतलेखिका.

१९७६ - जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist)

१९६१ - कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ

१९५७ - रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक

१८९१ - जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा