नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१ एप्रिल

घटना :-
२००४ - गूगलने gmail ही सेवा सुरू केली.

१९९० - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न

१९७३ - कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.

१९५७ - भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर, आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.

१९५५ - गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

१९३६ - ओरिसा राज्याची स्थापना झाली.

१९३५ - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.

१९३३ - भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण

१९२८ - पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला सिमला ऑफिसअसेही म्ह्टले जात असे.

१८८७ - मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१६६९ - उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

जन्म :-

१९४१ - अजित वाडेकर भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज

१९३६ - तरुण गोगोई आसामचे मुख्यमंत्री

१९१२ - पण्डित शिवरामबुवा दिवेकर हिन्दगंधर्व

१८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष

१८१५ - ऑटो फॉन बिस्मार्क जर्मनीचा पहिला चॅन्सेलर

१६२१ - गुरू तेग बहादूर शिखांचे नववे गुरू
१५७८ - विल्यम हार्वी –  इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२०१२ - एन. के. पी. साळवे भारतीय राजकारणी
२००६ - राजा मंगळवेढेकर बालसाहित्यकार

२००३ - प्रकाश घांग्रेकर गायक व नट

२००० - संजीवनी मराठे कवयित्री

१९९९ - श्रीराम भिकाजी वेलणकर भारतीय टपालखात्याच्या पिन कोडप्रणालीचे जनक

१९८९ - श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी समाजवादी, कामगार नेते, पत्रकार
१९८४ - पं नारायणराव व्यास ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा