नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१४ एप्रिल

घटना :-

१९९५ - टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

१९४४ - मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिनया मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटि पौंडा इतके आर्थिक नुकसान झाले.

१९१२ - आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

१७३६ - चिमाजीअप्पाने अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्यााच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

१६६५ - सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

१६६१ - प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

जन्म :-

१९४३ - रामदास फुटाणे वात्रटिकाकार

१९४२ - मार्गारेट अल्वा केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल

१९२७ - द. मा. मिरासदार विनोदी लेखक

१९२२ - उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक
१९१९ - शमशाद बेगम पार्श्वगायिका

१९१४ - शांता हुबळीकर अभिनेत्री

१८९१ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.

१६२९ - क्रिस्टियन हायगेन्स डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक

मृत्यू :-

२०१३ - राम प्रसाद गोएंका उद्योगपती

१९९७ - चंदू पारखी चित्रपट आणि नाट्य अभिनेते 

१९६३ - केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन इतिहासकार

१९६२ - भारतरत्न  सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंते, विद्वान, मुत्सद्दी
१९५० - भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा