नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ एप्रिल

घटना :-

१९९९ - चालकरहित निशांतविमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्या) त्रिशूलक्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी

१९९५ - देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नां चा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयरहा पुरस्कार प्रदान

१९७२ - केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९४८ - राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना

१९२२ - मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१८५३ - भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र जी. आय. पी. हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली.

जन्म :-

१९७८ - लारा दत्ता मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)

१९७२ - कोंचिता मार्टिनेझ स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू

१९६३ - सलीम मलिक पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९३४ - रामचंद्र दामोदर तथा राम नाईक –  भाजपचे नेते

१८८९ - चार्ली चॅपलिन अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार

१८६७ - विल्बर राईट – ऑर्व्हिल राईटसह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते

मृत्यू :-

२००० - दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ शाहू महाराजांचे चरित्रकार

१९९५ - रमेश टिळेकर अभिनेते व वकील 

१९६६ - जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस
१८५० - मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका

१७५६ - जॅक्स कॅसिनी फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा