नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१८ एप्रिल

घटना :-

२००१ - भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्या ने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण

१९७१ - एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोकशाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.

१९५४ - गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

१९५० - आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

१९३६ - पेशव्यांची राजधानी असणार्याथ पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

१९३० - क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

१९३० - आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

१९२४ - सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

१९२३ - पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना. हा राज्यातील पहिला शिवपुतळा. या पुतळ्याचे अनावरण मंदिराचे देणगीदार दिवंगत गणेश गोखले यांचे चिरंजीव डॉक्टर महादेव गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

१९१२ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथियाहे जहाज न्यूयॉर्कला पोचले

१८९८ - जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी

१८५३ - मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

१८३१ - यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाची स्थापना झाली.

१७२० - [चैत्र व. ८] शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्हा डनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.

१७०३ - औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१३३६ - हरिहर व बुक्कव यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

जन्म :-

१९५८ - माल्कम मार्शल वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९५६ - पूनम धिल्लन अभिनेत्री

१९१६ - ललिता पवार अभिनेत्री

१८५८ - महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – (स्त्रीशिक्षण व विधवा विवाह) समाजसुधारक
१७७४ - सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म

मृत्यू :-

२००२ - शरद दिघे महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष 

२००२ - थोर हेअरडल नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक

१९९९ - रघूवीर सिंह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार

१९९५ - पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्र अभ्यासक 

१९७२ - डॉ. पांडुरंग वामन काणे विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक

१९६६ - जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ

१९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१८९८ - दामोदर हरी चापेकर यांना फाशी
१८५९ - सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्याटोपे 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा