नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

५ एप्रिल

घटना :-

२००० - अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्रीअसे नामकरण करण्यात आले.

१९५७ - कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

१९५५ - प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

१९४९ - भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली.

१९३० - २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.

१६७९ - राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.

१६६३ - दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्ना त त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावलेहा शब्दप्रयोग रुढ झाला.

जन्म :-

१९२० - डॉ. रफिक झकारिया महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य

१९२० - आर्थर हॅले इंग्लिश कादंबरीकार

१९१६ - ग्रेगरी पेक हॉलीवूड अभिनेता

१९०९ - अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँडपटांचे निर्माते .

१९०८ - बाबू जगजीवनराम स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी

१८५६ - बुकर टी. वॉशिंग्टन अमेरिकन समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ

१८२७ - सर जोसेफ लिस्टर ब्रिटिश शल्यविशारद

मृत्यू :-

१९९८ - रुही बेर्डे चित्रपट व नाट्य अभिनेत्री 

१९९६ - भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक 

१९९३ - दिव्या भारती हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री

१९६४ - गोपाळ विनायक भोंडे नकलाकार 

१९४० - चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅीन्ड्र्यूज समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते

१९२२ - पंडिता रमाबाई आर्य महिला समाजच्या संस्थापिका, संस्कृत पंडित
१९१७ - शंकरराव निकम स्वातंत्र्यशाहीर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा