नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

११ फेब्रुवारी

घटना-
२०११ - १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.

१९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.

१९९० - २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका

१९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

१९२९ - पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटीया विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटीहे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.

१९११ - हेन्र्रीख पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेलअलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.

१८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

१८१८ - इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

१७५२ - पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

१६६० - औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

जन्म-

१९४२ - गौरी देशपांडे कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री

१९३७ - बिल लॉरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

१८४७ - थॉमस अल्वा एडिसन अमेरिकन संशोधक आणि उद्योजक

१८३९ - अल्मोन स्ट्राउजर अमेरिकन संशोधक

१८०० - हेन्री  फॉक्स टॅलबॉट छायाचित्रणकलेचा पाया घालणारे

मृत्यू-

१९९३ - सईद अमीर हैदर कमाल नक्वीय ऊर्फ कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी

१९७७ - फक्रुद्दीन अली अहमद भारताचे ५ वे राष्ट्रपती

१९६८ - प दीनदयाळ उपाध्याय तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते

१९४२ - जमनालाल बजाज प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
१६५० - रेने देकार्त फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा