नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२५ फेब्रुवारी

घटना-

१९९६ - स्वर्गदारातील तार्यासला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्यावचे कुसुमाग्रज ताराअसे नामकरण केले.

१९८६ - जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

१९६८ - मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४५ - दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.

१९४५ - दुसरे महायुद्ध तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३५ - फॉक्स मॉथविमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.

१८१८ - ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

१५१० - पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

जन्म-

१९७४ - दिव्या भारती हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री

१९४८ - डॅनी डेंग्झोप्पा चित्रपट अभिनेते

१९४३ - जॉर्ज हॅरिसन– ’बीटल्सचा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक

१८९४ - अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत

१८४० - विनायक कोंडदेव ओक बालवाङ्‌मयकार

मृत्यू-

२००१ - सर डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर

१९९९ - ग्लेन सीबोर्ग अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ

१९८० - गिरजाबाई महादेव केळकर लेखिका व नाटककार 

१९७८ - डॉ. प. ल. वैद्य प्राच्यविद्यासंशोधक

१९६४ - शांता आपटे चित्रपट अभिनेत्री

१९२४ - सर परशुरामभाऊ पटवर्धन - जमखिंडीचे संस्थानिक

१५९९ - संत एकनाथ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा