नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२६ फेब्रुवारी

घटना-

१९९९ - आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या  मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड

१९९९ - आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेलआगीत भस्मसात झाले.

१९९८ - परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

१९९५ - बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.

१९८४ - इन्सॅट-१-इहा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित

१९७६ - वि. स. खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

१९२८ - बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.

जन्म-

१९३७ - मनमोहन देसाई चित्रपट निर्माते, दिग्दर्शक

१९२२ - मनमोहन कृष्ण चरित्र अभिनेता

१८७४ - सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी

१८६६ - हर्बर्ट डाऊ अमेरिकन उद्योगपती

१८२९ - लेव्ही स्ट्रॉस अमेरिकन उद्योजक

१८०२ - व्हिक्टर ह्यूगो जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक

१६३० - गुरू हर राय शिखांचे ७ वे गुरू

मृत्यू-

२०१० - चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य

२००४ - शंकरराव चव्हाण केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

२००३ - राम वाईरकर व्यंगचित्रकार

२००० - बा. म. तथा रावसाहेबगोगटे बेळगाव येथील उद्योगपती 

१९६६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक

१९३७ - एल. के. अनंतकृष्ण अय्यर मानववंशशास्त्रज्ञ

१८८६ - नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक

१८७७ - मेजर थॉमस कॅन्डी कोशकार व शिक्षणतज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा