नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२८ फेब्रुवारी

घटना-

१९३५ - वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

१९२८ - डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो.

१९२२ - इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८४९ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किना-यामध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

जन्म-

१९५१ - करसन घावरी भारतीय क्रिकेटपटू

१९४८ - विदुषी पद्मा तळवलकर ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका

१९४४ - रविन्द्र जैन संगीतकार व गीतकार

१९४२ - ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक

१९२७ - कृष्णकांत भारताचे १० वे उपराष्ट्रपती

१९०१ - लिनस कार्ल पॉलिंग रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते

१८९७ - डॉ. शंकर दामोदर पेंडसे मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक

१८७३ - सर जॉन सायमन सायमन कमिशनया आयोगाचे अध्यक्ष

मृत्यू-

१९९९ - भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी औध संस्थानचे राजे 

१९९८ - राजा गोसावी अभिनेता

१९९५ - कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव  कथा, संवाद व गीतलेख

१९८६ - ओलोफ पाल्मे - स्वीडनचे २६ वे पंतप्रधान

१९६६ - उदयशंकर भट्ट आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार

१९६३ - डॉ. राजेन्द्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती

१९३६ - कमला नेहरू पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी

१९२६ - स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद

 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा