नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

६ फेब्रुवारी

घटना-
१९५२ - इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली. ती राणी बनल्याची बातमी तिला केनियातील झाडावरच्या एका हॉटेलमधे देण्यात आली.

१९४२ - दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३२ - कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.

१९३२ - प्रभातचा अयोध्येचा राजाहा बोलपट मुंबईच्या कृष्णाया चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९१८ - ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

१६८५ - जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.

जन्म-

१९८३ - श्रीशांत क्रिकेटपटू, सट्टेबाज व फिक्सर

१९५२ - डॉ. रिक चार्ल्सवर्थ ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी

१९१५ - रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप आधुनिक राष्ट्रकवी

१९११ - रोनाल्ड रेगन अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष

मृत्यू-

२००१ - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते 

१९९३ - आर्थर अॅश अमेरिकन टेनिस खेळाडू

१९७६ - ऋत्विक घटक चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक

१९५२ - जॉर्ज (सहावा) इंग्लंडचा राजा

१९३९ - सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक

१९३१ - मोतीलाल गंगाधर नेहरू भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित
१८०४ - जोसेफ प्रिस्टले इंग्लिश रसायनशास्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा