नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० सप्टेंबर

घटना :-

२००० - देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे हॉल ऑफ फेमहा विशेष पुरस्कार जाहीर

१९९८ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना 'शांतिस्वरुप भटनागर' पुरस्कार जाहीर

१९९४ - गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते दादासाहेबफाळके पुरस्कारप्रदान

१९९३ - लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.

१९६१ - दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्न०ई) येथे खेळला गेला.

१९४७ - पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९३५ - हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

१८९५ - फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

१३९९ - हेन्रीस (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

जन्म :-

१९८० - मार्टिना हिंगीस स्विस लॉनटेनिस खेळाडू

१९७२ - शंतनु मुकर्जी ऊर्फ शान’ – पार्श्वगायक

१९३३ - प्रभाकर पंडित संगीतकार व व्हायोलिनवादक

१९६१ - चंद्रकांत पंडित क्रिकेटपटू

१९२२ - हृषिकेश मुकर्जी चित्रपट दिग्दर्शक

१९०० - एम. सी. छागला न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री

मृत्यू  :-

२००१ - केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन

१९९८ - चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदानचळवळीतील कार्यकर्त्या

१९९२ - गंगाधर देवराव खानोलकर लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्म य सेवकया कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.

१९८५ - चार्लस रिच्टर अमेरिकन भूवैज्ञानिक
१६९४ - मार्सेलिओ माल्पिघी इटालियन डॉक्टर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा