नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

११ सप्टेंबर

घटना:

२००१ - अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.

१९७२ - नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.

१९६५ - भारत पाक युद्ध - भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

१९६१ - ’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.

१९१९ - अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

१८९३ - स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.


जन्म :

१९१७ - फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष

१९१५ - पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या

१९०१ - आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष.

१८९५ - आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्न.

१८८५ - डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार


मृत्यू :

१९९८ - नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक

१९८७ - महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ.

१९७१ - निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष

१९६४ - गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक

१९४८ - बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल

१९२१ - सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा