नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१ सप्टेंबर

घटना:

१९९१ - उझबेकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९७२ - आइसलँडमधील रिकजेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

१९६९ - लिबीयात उठाव होऊन हुकूमशहा मुअम्मर गडाफी सतेवर आला.

१९५६ - भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.

१९५१ - अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अॅdन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.

१९३९ - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्यास महायुद्धाची सुरुवात झाली.

१९१४ - रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.

१९११ - पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.


जन्म :

१९४९ - पी. ए. संगमा – लोकसभेचे माजी सभापती आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री

१९२१ - माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज

१९१५ - राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक.

१९०८ - कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक

१८९६ - अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक



मृत्यू :

२००८ - थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक

१८९३ - काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक.

१७१५ - फ्रान्सचा राजा १४ वा लुई 

१५८१ - गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू

१५७४ - गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा