नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१५ सप्टेंबर


घटना :

२००८ - लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेने दिवाळे काढले. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दिवाळखोरी आहे.

२००० - ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९५९ - प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. ही भारतातील पहिली दूरदर्शन सेवा होती.

१९५९ - निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले.

१९५३ - श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड

१९४८ - भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत

१९३५ - जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.

१९३५ - भारताचे पहिले पब्लिक स्कूल ’द डून स्कूल’ (The Doon School) सुरू झाले.

१९१६ - पहिले महायुद्ध - लढाईत पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर सॉमच्या युद्धात केला गेला

१८३५ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.

१८२१ - कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडूरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन

१८१२ - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.


जन्म :-

१९४६ - माईक प्रॉक्टर – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच

१९३९ - सुब्रम्हण्यम स्वामी – अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ

१९३५ - दगडू मारुती तथा ’दया’ पवार – लेखक 

१९२१ - कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते 

१९०९ - रत्नाचप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकार नेते

१९०९ - सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री 

१९०५ - राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक

१८९० - अॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका

१८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक

१८६० - भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी

१२५४ - मार्को पोलो – इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी 


मृत्यू  :-

२००८ - गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ

२०१२ - के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक 

१९९८ - – गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा